मुंबई/एनजीएन नेटवर्क
टाटा एआयए लाईफ इनश्युरन्स कंपनी लिमिटेड (टाटा एआयए) ने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ७,०९३ कोटी रुपयांचे वैयक्तिक भारित नवीन व्यवसाय प्रीमियम उत्पन्न नोंदवले. आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील ४,४५५ कोटी रुपयांपेक्षा त्यात ५९% वाढ झाली. या कामगिरीमुळे कंपनीला IWNBP उत्पन्नामध्ये खा जगी जीवन विमा कंपन्यांमध्ये ३ ऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले. आर्थिक वर्षातील एकूण प्रीमियम उत्पन्न मागील वर्षातील १४,४४५ कोटी रुपयांच्या तुलनेत ४२% ने वाढून २०,५०३ कोटी रुपये झाले. आर्थिक वर्ष २२ मधील ७१ कोटी रुपयांवरून वर्षभरात निव्वळ नफा ६१५% नी वाढून ५०६ कोटी रुपये झाला.
टाटा एआयए लाइफने अंडरराइट केलेली रिटेल सम अॅश्युअर्ड ३,०७,८०४ कोटी रुपयांवरून ४४३,४७९ कोटी रुपये इतकी झाली असून आर्थिक वर्ष २२ च्या तुलनेत ४४.०८% ची वाढ झाली आहे. खाजगी जीवन विमा कंपन्यांमध्ये आर्थिक वर्ष २३ मध्ये रिटेल सम अॅश्युअर्डवर आधारित टाटा एआयएचा बाजारपेठीय हिस्सा आर्थिक वर्ष २२ मधील २१% वरून २७% झाला आहे. एकूण नूतनीकरण प्रीमियम उत्पन्नात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३२%ची वाढ झाली असून हे उत्पन्न ९,०८६ कोटी रुपयांवरून ११,९६४ कोटी रुपये इतके झाले आहे. व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) २१%ने वाढून ५८,५७० कोटी रुपयांवरून ७१,००६ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
टाटा एआयएने क्लेम सेटलमेंट रेशो आणि पर्सिस्टन्सी असूनही दोन सर्वात महत्त्वाच्या ऑपरेशनल मेट्रिक्सवर अतिशय प्रभावीपणे वितरण केले. वैयक्तिक मृत्यू दाव्यांच्या सेटलमेंटचे प्रमाण आर्थिक वर्ष २२ मधील ९८.५३% वरून आर्थिक वर्ष २३ मध्ये ९९.०१% पर्यंत सुधारले आहे. लाइफ इन्शुरन्स कंपन्यांच्या कार्यात्मक उत्कृष्टतेचे वैशिष्ट्य असलेली मजबूत पर्सिस्टन्सी सादर करणे कंपनीने सुरू ठेवले आहे. आर्थिक वर्ष २२ च्या तुलनेत, कंपनीचे १३ व्या महिन्याचे पर्सिस्टन्सी प्रमाण (प्रिमियमवर आधारित) ८७.७६% वरून ८८.१% पर्यंत सुधारले आहे. कंपनीची वर्षासाठीची २५ व्या महिन्याची पर्सिस्टन्सी ७९.६% होती.
आज, समग्र आरोग्य हा संवादाचा एक आवश्यक विषय बनला आहे. परिणामी, जीवन विमा कंपन्या त्यांची उत्पादने विक्रीच्या वेळी बदल करू शकतात आणि आपल्या ग्राहकांच्या आरोग्यासाठी अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात. त्यामुळे सर्वांगीण कल्याण उपाय सुविधांसह मृत्यू आणि आजारपणाचे प्रमाण कमी होऊ शकते. वर्षभरात टाटा एआयएने देखील ग्राहकांच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद देत बदल घडविले आणि ‘ग्राहक ध्यास’ या मूल्याद्वारे चालविलेले नाविन्यपूर्ण आणि ग्राहक-केंद्रित उपायसुविधा सादर केल्या. आपल्या ग्राहकांना अधिक निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी सक्षम करण्याचे साधन म्हणून टाटा एआयएने भारतीय ग्राहकांसाठी व्हिटॅलिटी नावाचा उद्योग-अग्रणी सर्वांगीण कल्याण कार्यक्रम सादर केला आहे. जोडीला ४,५०० हून अधिक स्वतंत्र आणि जागतिक-अग्रणी तज्ञांच्या नेटवर्कद्वारे गंभीर आजारांसाठी वैद्यकीय व्यवस्थापन उपाय प्रदान करणार्या मेडिक्स या जागतिक कंपनीशी भागीदारी केली आहे. या उपक्रमांनी टाटा एआयए लाइफला ग्राहकांसाठी त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर केवळ लाभ आणि दावे पूर्ण करणारे दाते यापासून अधिक मूल्यवर्धित भागीदार म्हणून विकसित होण्यास सक्षम केले आहे.
विकास, सहयोग आणि नावीन्यपूर्णता यांना चालना देणारे कामाचे वातावरण निर्माण करण्याच्या सातत्यपूर्ण आणि अखंड प्रयत्नांची पावती म्हणून टाटा एआयएला २०२२ साठी भारतातील एक किनसेंट्रीक बेस्ट एम्प्लॉयर म्हणून नावाजले गेले. या सन्मानामुळे याआधी केवळ दहा कंपन्यांसह विशेष समूह असलेल्या किनसेंट्रीक बेस्ट एम्प्लॉयर क्लब मध्ये टाटा एआयएला स्थान मिळाले. देशातील सर्वोत्कृष्ट कार्यस्थळांचे वैशिष्ट्य असलेले ग्रेट प्लेस टू वर्क® प्रमाणपत्र कंपनीने मिळवले आहे. कठोर कार्य संस्कृती मूल्यांकन प्रक्रियेतून ही मान्यता मिळाली असून त्यासाठी कंपनीच्या ७०% किंवा अधिक कर्मचार्यांनी एक उत्तम कार्यस्थळ म्हणून रेट करणे आवश्यक असते.