NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

तनाएराचे नाशिकमध्ये पहिले स्टोर सुरु; हातांनी विणलेल्या साड्यांचे कलेक्शन प्रस्तुत

0

नाशिक : टाटा समूहातील एक ब्रँड, तनाएराने नाशिकमध्ये नवे स्टोर सुरु करून महाराष्ट्रात विस्ताराची घोडदौड कायम ठेवली आहे. हे तनाएराचे नाशिकमधील पहिले आणि महाराष्ट्रातील नववे स्टोर आहे. शहरातील चोखंदळ साडीप्रेमींसाठी पर्वणी ठरेल असे हे तब्बल २८०० चौरस फुटांचे स्टोर कॉलेज रोडवर येवलेकर मळा येथे आहे. तनाएराचे सीईओ श्री अंबुज नारायण आणि टायटन कंपनी लिमिटेडचे पश्चिम विभागाचे रिजनल बिझनेस हेड श्री नीरज भाकरे यांच्या उपस्थितीत स्टोरचे उदघाटन पार पडले.

नाशिकच्या सांस्कृतिक समृद्धतेचे सार प्रतिबिंबित करणारे नवीन तनाएरा स्टोर शहरातील प्राचीन काळापासूनच्या कापड परंपरांचा, निपुण कारागिरांच्या पिढ्यापिढ्यांपासून चालत आलेल्या कला वारशाचा सन्मान करते. या स्टोरमध्ये भारतातील विविध ठिकाणच्या कापड प्रकारांमधून चोखंदळपणे निवडून आणलेले कलेक्शन उपलब्ध आहे. नाजूक पॅटर्न्स, दर्जेदार, अस्सल कापड आणि उठावदार, आकर्षक रंगांची भरपूर रेलचेल इथे पाहायला मिळते. लग्नासाठी खरेदीचे हे आदर्श ठिकाण आहे. पैठणी, कांजीवरम, बनारसी, मऊशार रेशमी, टसर, एम्ब्रॉयडरी केलेल्या, प्रिंटेड रेशमी, सुती साड्या आणि विगन कलेक्शन्स हे सर्व एकाच ठिकाणी तनाएरा स्टोरमध्ये मिळत आहे. जाणकार, सौंदर्यप्रेमी नाशिककरांची आवड याठिकाणी नक्की पूर्ण होईल. शान आणि सौंदर्य दर्शवणाऱ्या या स्टोरमध्ये अभिजात व आधुनिक डिझाइन्सचा मनमोहक संगम साधण्यात आला आहे. अस्सल आणि नैसर्गिक कापडांच्या, हातांनी विणलेल्या साड्या, ब्लाऊजेस, रेडी-टू-वेयर आणि न शिवलेले कुर्ता सेट्स यांचे भरपूर मोठे कलेक्शन याठिकाणी उपलब्ध आहे.

तनाएराचे सीईओ श्री अंबुज नारायण यांनी यावेळी सांगितले, “फॅशन आणि लाइफस्टाइलचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरात आमचे पहिले स्टोर सुरु करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. नैऋत्य भारतामध्ये तनाएराच्या विस्तारातील एक महत्त्वाचे ठिकाण असलेल्या नाशिकमध्ये हातांनी विणलेल्या साड्यांचे खास कलेक्शन प्रस्तुत करून भारतातील समृद्ध कापड परंपरा जिवंत साकार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आधुनिक डिझाईन संवेदनांबरोबरीनेच कालातीत कापड परंपरांचा सन्मान करणारा अनुभव या स्टोरमध्ये मिळतो. साडी आणि पारंपरिक कला ज्यांना मौल्यवान वाटतात त्यांची आवड याठिकाणी हमखास पूर्ण होईल.”

Leave A Reply

Your email address will not be published.