NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

टॅली सोल्युशन्सचे नवे टॅलीप्राईम ४.० लघु व मध्यम उद्योजकांना ठरणार उपयुक्त

0

नाशिक : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग इकोसिस्टिमच्या नव्याने निर्माण होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, टॅली सोल्युशन्स या भारतातील सर्वात मोठी बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेयर पुरवठादार कंपनीने टॅलीप्राईम ४.० संपूर्ण जगभरात सुरु करण्यात आल्याची घोषणा आज केली आहे. व्यवसाय मालक आणि उत्पादनांचा प्रत्यक्ष वापर करणारे युजर्स यांना अतुलनीय व प्रगत अनुभव पुरवण्याच्या टॅलीच्या व्हिजनला अनुसरून हे लॉन्च करण्यात आले आहे. पुढील २ ते ३ वर्षात आपल्या ग्राहकसंख्येत ५०% वाढ आणि ४०% सीएजीआर मिळवण्याची टॅली सोल्युशन्सची योजना आहे. युजरशी संवाद साधणारा इन्ट्युटिव्ह आणि प्रभावी डॅशबोर्ड, एमएस एक्सेलमधून सहजपणे डेटा इम्पोर्टची सुविधा आणि व्हाट्सअप फॉर बिझनेस ही टॅलीप्राईम ४.० ची नवी वैशिष्ट्ये नवा आणि प्रगत अनुभव प्रदान करतील.

महाराष्ट्रातील चौथे सर्वात मोठे शहर नाशिकमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. रसायने, कापड उद्योग, अभियांत्रिकी, औषधे, माहिती तंत्रज्ञान, खाद्य व पेय व्यवसाय आणि पर्यटन अशा अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये एमएसएमईंची संख्या वाढत आहे. उत्पादनाबरोबरीनेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. सध्या नाशिक भागात १.८१ लाख एमएसएमई आहेत आणि येत्या काही वर्षात ही संख्या १००% नी वाढेल. राज्यभरातील एमएसएमईंना डिजिटल स्वीकार करता यावा, नावीन्यपूर्णतेला वाव मिळावा यासाठी टॅली सोल्युशन्स एमएसएमईंसोबत सक्रिय सहयोग करत आहे. सध्या महाराष्ट्रात टॅलीचा मार्केट शेयर जवळपास ७०% पेक्षा जास्त आहे. येत्या पाच वर्षात आपला व्यवसाय दुपटीने वाढवण्याचे उद्दिष्ट या ब्रँडने आखले आहे.

टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे वेस्ट झोनचे जनरल मॅनेजर श्री. समीर दीक्षित यांनी सांगितले, “काही वर्षांपूर्वी टॅलीप्राईम सुरु करून आम्ही प्रभावी व्यवसाय व्यवस्थापन अनुभव प्रदान करण्यासाठी कार्यरत आहोत. लघु व मध्यम व्यवसाय त्यांच्या व्यवसायांचे संचालन ज्याप्रकारे करतात ते सुलभ आणि अधिक जास्त व्यावसायिक पद्धतीने करण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. टॅलीप्राईम ४.० आम्ही आमच्या युजर्सना मिळणारा अनुभव अधिक प्रगत करण्यावर आणि व्यवसाय मालकांना त्यांचे काम अधिक व्यावसायिक व कार्यक्षम पद्धतीने करण्यावर भर देतो. यामध्ये नवीन व अधिक कार्यक्षम फंक्शनॅलिटीज आहेत ज्या व्यवसाय व्यवस्थापन सुयोग्य करण्यासाठी तसेच डेटासोबत अखंडित इंटरॅक्शन करण्यासाठी डिझाईन करण्यात आल्या आहेत. इंट्यूटिव्ह व प्रभावी डॅशबोर्डमुळे टॅलीचे प्रचंड मोठे रिपोर्टींग इंजिन अधिक प्रगत बनले आहे, प्रोफेशनल व्हाट्सअप कम्युनिकेशन आणि एक्सेल शीट्समधील डेटाचे सहजसोपे एकत्रीकरण करण्याची सुविधा यामुळे युजर्सना त्यांचे व्यवसाय चालवणे आणि वाढवणे अधिक सोपे होईल.”

टॅली गेली दशके एमएसएमई इकोसिस्टिमच्या गरजांचा अभ्यास करत आहे आणि त्यासाठी आवश्यक, अनुरूप उपाययोजना, सुविधा पुरवत आहे. टॅलीप्राईम ४.० सोबत व्यवसाय त्यांच्या वर्तमान प्रभावी रिपोर्टींग इंजिनचे अजून जास्त लाभ मिळवू शकतील कारण यामध्ये इंट्यूटिव्ह डॅशबोर्ड्स आहेत, व्यवसायाच्या विशिष्ट गरजा जाणून घेऊन त्या पूर्ण करू शकेल अशा अनलिमिटेड व्हिज्युअल डेटा ऍनालिसिसचे लाभ त्यांना घेता येतील. व्हाट्सअप फॉर बिझनेसच्या एकीकरणामुळे रिपोर्ट्स, इन्व्हॉईस, पावत्या आणि इतर सूचना हितधारकांसोबत सहजपणे शेयर करता येतील, त्यामुळे बिझनेस कम्युनिकेशन अधिक वेगवान, अचूक व व्यावसायिक बनेल. त्याचप्रमाणे टॅलीप्राईमचे सहजसोपे डेटा इम्पोर्ट वैशिष्ट्य कोणत्याही एक्सेल डॉक्युमेंटमधील डेटा व्हर्च्युअली इम्पोर्ट करू शकते.

आजवर टॅलीप्राईमच्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओने बिझनेस ऑपरेशन्स सहजसुलभ करण्यात अनेक महत्त्वाचे टप्पे यशस्वीपणे पार केले आहेत, खासकरून अनुपालनाविषयीच्या आवश्यकता यामध्ये पूर्ण करण्यात आल्या आहेत आणि व्यवसाय व्यवस्थापन सुविधा प्रदान केल्या आहेत. टॅलीप्राईम ४.० हे व्यवसायांना अधिक सक्रिय, कनेक्टेड आणि स्मार्ट पद्धतीने व्यवसाय व्यवस्थापन करण्यात सक्षम बनवेल. ऍक्टिव्ह टीएसएस सबस्क्रिप्शन ज्यांच्याकडे आहे त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता या नवीन रीलीजचा लाभ घेता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.