NGN News
Latest Marathi News

शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्या : आ. हिरे

  • नाशिक पश्चिम मतदारसंघातील भाजप नगरसेवकांचा सन्मान

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

पश्चिम मतदारसंघातील भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांना आ. सीमा हिरे निवासस्थानी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व नगरसेवकांचे स्वागत करण्यात येवून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. गेल्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपचा आकडा ४७ पैकी २२ नगरसेवक ह्यावर होता. आताच्या निवडणुकीत तो आकडा ४७ पैकी ३० नगरसेवक ह्यावर येऊन पोहोचला असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

याप्रसंगी पश्चिम मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाबाबत आ. सीमा हिरे यांनी सखोल व सकारात्मक चर्चा केली . नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, आरोग्य, शिक्षण तसेच इतर मूलभूत गरजांबाबत सविस्तर विचारविनिमय झाला. विशेषतः अनेक दिवसांपासून रखडलेली व प्रलंबित असलेली विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांनी व्यक्त केला .

आ. सीमा हिरे म्हणाल्या, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे, पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करणे, तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे काम करावे. आगामी काळात नागरिकांशी नियमित संवाद ठेवणे, त्यांच्या तक्रारी तत्काळ सोडवणे आणि मतदारसंघाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधणे हे प्रमुख उद्दिष्ट राहील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणारे काम करण्याचा आणि पश्चिम मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प या कार्यक्रमातून सर्वांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजप शहर अध्यक्ष सुनिल केदार,महेश हिरे,सुनील देसाई, रश्मी हिरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

Comments are closed.