नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेला एक ब्रँड आणि महिंद्रा ग्रुपमधील एक सदस्य, स्वराज ट्रॅक्टर्सने आज ४० ते ५० अश्वशक्ती विभागात ट्रॅक्टर्सची नवी श्रेणी सादर केली आहे.
हरित क्रांतीमध्ये बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी आणि भारतातील पहिला स्वदेशी ट्रॅक्टर सादर करण्यासाठी नावाजल्या गेलेल्या स्वराज ट्रॅक्टर्सची भारतातील शेतीमध्ये यांत्रिकीकरणात प्रगती घडवून आणण्याप्रती आणि भारतीय शेतकऱ्यांच्या नवनवीन गरजा पूर्ण करण्याप्रतीची अढळ निष्ठा नव्या स्वराज श्रेणीमधून दिसून येते. भारतातील सर्वाधिक वेगाने विस्तार पावत असलेल्या आणि प्रभावी ४०-५० अश्वशक्ती ट्रॅक्टर विभागात स्वराजच्या पोर्टफोलिओच्या स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ही नवी श्रेणी सज्ज आहे.
शेतकऱ्यांना सक्षम केले जावे आणि शेतीची उत्पादकता वाढावी या उद्देशाने तयार करण्यात आलेली ही नवी श्रेणी आपल्या विभागात कामगिरीचे नवे मानक रचत आहे. या ट्रॅक्टर्समध्ये अतुलनीय शक्ती, विश्वासार्हता आणि शैली यांचा मिलाप दिसून येतो, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान यांच्या बळावर हे ट्रॅक्टर्स सर्वात जास्त आव्हानात्मक परिस्थितीमध्ये देखील उत्तम कामगिरी बजावू शकतात.
अवजड व नवनवीन कामे सुरळीतपणे करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेल्या या नव्या श्रेणीने शेतीतील कामांची नवी व्याख्या रचली आहे, हे ट्रॅक्टर सोबत असतील तर सर्वात जास्त आव्हानात्मक कामे देखील अगदी सुरळीतपणे पार पाडली जातील. हे ट्रॅक्टर्स आधीपासून केल्या जात असलेल्या आणि नवीन कामांमध्ये अतुलनीय शक्ती व अधिक जास्त उत्पादनक्षमतेसह काम करतात व आधुनिक शेतीच्या मागण्या पूर्ण करतात.
एमअँडएम लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे प्रेसिडेंट श्री हेमंत सिक्का यांनी सांगितले, “स्वराज ब्रँडला भारतीय शेतकऱ्यांच्या हृदयात मानाचे स्थान मिळाले आहे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. या नवीन ट्रॅक्टर श्रेणीमधून आम्ही अत्याधुनिक वैशिष्ट्ये व तंत्रज्ञान सादर करत आहोत, ज्यामुळे भारतीय शेतीचे यांत्रिकीकरण अधिक प्रगत व्हावे व शेतकऱ्यांना कमी मेहनतीमध्ये अधिक जास्त उत्पादन करण्यासाठी सक्षम केले जावे, वृद्धी व समृद्धीला चालना दिली जावी हा आमचा उद्देश आहे.”
एमअँडएम लिमिटेडच्या स्वराज डिव्हिजनचे सीईओ श्री. हरीश चव्हाण यांनी नवीन ट्रॅक्टर्स सादर करत असल्याचा आनंद व उत्साह दर्शवत सांगितले, “नवी ट्रॅक्टर श्रेणी सादर करून आम्ही या ब्रँडच्या भविष्याला दिशा देत आहोत, त्याची शक्ती, विश्वासार्हता वाढवत आहोत, भारतीय शेतीच्या भविष्यातील यांत्रिकीकरण गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला सज्ज करत आहोत. कामगिरीव्यतिरिक्त या नव्या श्रेणीमध्ये आराम, नवनवीन काम करू शकण्याची बहुउपयुक्तता, खूप मोठया ग्राहकवर्गाला आकर्षित करून घेण्याची क्षमता व आधुनिक तरीही अस्सल शैली यावर देखील या नव्या श्रेणीमध्ये विशेष भर देण्यात आला आहे.”
या नव्या श्रेणीमार्फत ब्रँडमध्ये अधिक जास्त आधुनिकता आणण्यासाठी स्वराजने त्यामध्ये आधुनिक अएस्थेटिक्सचा अतिशय काळजीपूर्वक समावेश केला आहे, आधुनिक रचना घटकांना त्यामध्ये एकत्रित करण्यात आले आहे, त्याचवेळी ब्रँडचे अस्सल कालातीत डिझाईन सुरक्षित राखण्यात आले आहे. खूप मोठ्या ग्राहकवर्गामध्ये ही श्रेणी जास्तीत जास्त लोकप्रिय व्हावी यासाठी स्वराजने स्वतःचे एक समाधानी ग्राहक व महान क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी यांना आपल्या नवीन मार्केटिंग कॅम्पेनमध्ये सहभागी करून घेतले आहे. या कॅम्पेनमध्ये नवीन श्रेणीची सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये अधोरेखित करण्यात आली आहेत. स्वराजच्या ग्राहकवर्गाचा ब्रँडवरील विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा यावर भर देण्यात आला आहे.
किमतीचे सर्वोत्तम मूल्य मिळवून देणारी, नवी स्वराज श्रेणी भारतभरातील सर्व स्वराज डीलर्सकडे आता उपलब्ध आहे. याच्या किमती 6.9 Lacs रुपयांपासून (बेस व्हेरियंटसाठी ४२ एचपी (31.3 kW)) 9.95 Lacs रुपयांपर्यंत (टॉप-एन्ड व्हेरियंटसाठी ५० एचपी (37.2 kW)) आहेत. शेतकऱ्यांना साहाय्य म्हणून स्वराज ट्रॅक्टर्स आकर्षक कर्जसुविधा देखील सादर करणार आहे. त्यामुळे सर्वात नवीन स्वराज ट्रॅक्टर श्रेणीचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घेता येऊ शकेल. याखेरीज या ट्रॅक्टर्ससोबत सहा वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. उत्पादनांची गुणवत्ता व ग्राहकांचे समाधान जपण्याप्रती स्वराज ब्रँडची अढळ निष्ठा व शेतकरी वर्गाला विश्वास व मनःशांती मिळवून देण्याप्रती ब्रँडची बांधिलकी यामधून दिसून येते.
नव्या ट्रॅक्टर श्रेणीची ठळक वैशिष्ट्ये:
अधिक जास्त क्युबिक क्षमता आणि अधिक जास्त टॉर्क इंजिन्स
अधिक जास्त हायड्रॉलिक लिफ्ट क्षमता
अवजड व आधुनिक शेतीची कामे हाताळण्यासाठी श्रेणीतील सर्वोत्तम ६ स्पीड पीटीओ
४०० तास सर्व्हिस इंटरव्हल, अधिक विश्वसनीय फ्रंट ऍक्सल आणि ट्रान्समिशन असलेले अधिक विश्वासार्ह इंजिन
मल्टीस्पीड १२+३ ट्रान्समिशन आयपीटीओ आणि ४डब्ल्यूडी हे पर्याय संपूर्ण उत्पादन श्रेणीमध्ये उपलब्ध, अधिक
जास्त उत्पादनक्षमता
साईड शिफ्ट, आयपीटीओ आणि सहजसोपे हिच या वैशिष्ट्यांसह अधिक जास्त आराम
आधुनिक डिजिटल क्लस्टर, एलईडी टेल लॅम्प्स आणि डे लाईट रनिंग पर्यायांसह स्टायलिश सिंगल पीस बॉनेट
६ वर्षे किंवा ६००० तासांपर्यंतची श्रेणीतील सर्वोत्तम स्टॅंडर्ड वॉरंटी