NGN News
Latest Marathi News

बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास बेड्या; मनमाडला कारवाई

मनमाड : विशेष प्रतिनिधी

हजरत निजामुद्दीन येथून कल्याणकडे जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये एका अल्पवयीन बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

मध्यप्रदेश येथील एक सरकारी कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसमोर मंगला एक्सप्रेसच्या A1 कोच मध्ये प्रवास करीत असताना रात्रीच्या वेळेस वरच्या बर्थ वर बालिका झोपली होती. त्या ठिकाणी झोपेचे नाटक करून तरुण वर चढून संबंधित अल्पवयीन मुलीशी गैर कृत्य करण्याचा प्रयत्न करीत असताना संबंधित मुलीने त्यास विरोध केला. त्याने तिचे तोंड दाबले पण संबंधित मुलगी जोराने ओरडून उठल्याने या तरुणाने त्या ठिकाणावरून पळ काढला. सदरची घटना संबंधित मुलीच्या वडिलांच्या लक्षात आल्याने त्याने त्या तरुणाचा पाठलाग केला हा करून पॅन्ट्री कार जवळ आढळून आला. यानंतर संबंधित व्यक्तीने सदर प्रकार गाडीमध्ये पेट्रोलिंगला असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सदरची घटना मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांना कळवली. संबंधित संशयित तरुणलां मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या संदर्भात मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलीस स्थानकात छेडखानी तसेच तिने संहिता कलम 74 बालकांचे लैंगिक कलेक्शन कायद्यान्वये पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित संशयित तरुणाला मालेगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयत येथे हजर करण्यात आले होते. दोन दिवस पोलीस पोलिस कोठडी देण्यात आलीसंबंधित गुन्ह्याचा पोलीस उपनिरीक्षिका जोगदंड करीत आहे.

Comments are closed.