NGN News
Latest Marathi News

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुक निकालाचा भाजपचा सर्व्हे सांगतो…

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच भाजपचा सर्व्हे समोर आला आहे. या सर्वेनुसार राज्यात भाजपचे 175 नगराध्यक्ष विजयी होतील. तर, महायुतीमध्ये आणि निवडणूक निकालांमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचं पाहायला मिळेल. पुढील 2 दिवसांत मतदान होऊन 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत भाजपने आपली मोठी टीम प्रचारासाठी मैदानात उतरवली असून अंतर्गत सर्व्हे देखील करण्यात आला. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं असून नगरपालिका निवडणुकांचा प्रचार आता दोन दिवसांत संपुष्टात येईल. तत्पूर्वी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त असून नागरिकांना, मतदारांना विकासाचे, निधीचं आश्वासन देत आहेत. या प्रचारात भाजपने मोठी आघाडी घेतल्याचं दिसत असून भाजप प्रदेशाध्यक्षांसह अनेक मंत्री प्रचारासाठी नगरपालिका पिंजून काढत आहेत. आता, भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर आला असून या नगरपरिषद निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ ठरणार असल्याचे सांगण्यात येते. राज्यात भाजपचे 175 नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज सर्वेक्षणात आहे.

Comments are closed.