मुंबई/एनजीएन नेटवर्क
शिंदे गटातील एकही मंत्री फुटणार नसून उलट उद्धव ठाकरे गटातील सहा आमदार आमच्या संपर्कात आहेत. काल माझी चर्चा देखील झाली आहे. ठाकरे गटातील आमदार म्हणतात आपल्याला मुंबईत भेटायचे नाही. मुंबईच्या बाहेर भेटूया, असे विधान मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
शिवसेनेत नाराजी असल्याच्या केवळ अफवा आहेत. आमच्यात मंत्रिपदावरुवन कोणतीही वादावादी झाली नाही आणि होणार नाही. कोणीतरी सांगितले की ६ ते ७ आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत. मात्र ही गोष्ट खरी नाही, असे सामंत ठामपणे म्हणाले. ठाकरे गटातील सहा आमदार आमच्या संपर्कात आहेत. काल माझी चर्चा देखील झाली आहे. ठाकरे गटातील आमदार म्हणतात आपल्याला मुंबईत भेटायचे नाही. मुंबईच्या बाहेर भेटूया, असे या आमदारांनी सुचाव्ल्याचा दावा सामंत यांनी केला.