NGN News
Latest Marathi News

ब्रिटीश पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सुरगाण्याच्या पिंपळसोंडचे पथक

  • पारंपरिक पद्धतीने नृत्य सादरीकरण; परदेशी पाहुण्यांची मने जिंकली

** वाजीद शेख

सुरगाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क

ब्रिटीश पंतप्रधान किर स्टार्मर यांच्या मुंबई भेटीदरम्यान त्यांच्या स्वागतासाठी आयोजित शोभायात्रेत नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल सुरगाण्याचे पथक सहभागी झाले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते ताज हॉटेल दरम्यान ११ स्वागत स्थळे निर्माण करण्यात आली होती. या स्थळांपैकी बांद्रा ईस्ट या ठिकाणी सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड येथील कलापथकाने त्यांचे स्वागत केले.

या कलापथकाने उत्कृष्ट आदिवासी पारंपरिक पद्धतीने नृत्य सादरीकरण करीत परदेशी पाहुण्यांची मने जिंकली. या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई अप्पर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग ( राजशिष्टाचार) मंत्रालय मुंबई तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार
यांनी कौतुक केले

कलापथकात कावडधारी श्रावणबाळ, भीम, अर्जुन, राजा ज्योतिंग, मारुती, वाल्मिकी ऋषी आदी पौराणिक कथेतील पात्रांचा समावेश होता. श्रावणबाळ कावडधारी रमेश महाले यांनी कलामंचावर उत्कृष्ट नृत्य सादर करीत परदेशी पर्यटकांची मने जिंकली. या कलापथकात आदिवासी लोकसंस्कृती कलाकार डांगी भाषिक शिक्षक रतन चौधरी,मुकूंदा पाडवी, शिवराम चौधरी, नृत्य कलाकार किशोर ठाकरे, महेंद्र वळवी, गुलाब गायकवाड, सुरेश गवळी प्रभाकर ठाकरे, उमेश वळवी, अजय जाधव, नितीन ठाकरे, हेमंत महाले, हेमंत गवळी, हरिश्चंद्र गवळी, रमेश महाले, रमेश बागुल, मनोज कुवर, सुधाकर गावित यांचा सहभाग होता.

——-

आम्ही दुर्गम आदिवासी भागातील कलाकारांना परदेशी पाहुण्यांचे स्वागत करतेवेळी कला सादर करण्याची संधी मिळाली. या सहभागाची सांस्कृतिक मिरवणूक खरोखरच अविस्मरणीय राहील. हा उत्साह चिरंतन राहील. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे बोहाडा कलेची दखल घेऊन कलेचा वारसा टिकवण्यासाठी हे मुखवटे ठेवण्याकरीता” सांस्कृतिक भवन” मंजूर करावे.

  • शिवराम चौधरी
    बोहाडा कलापथक प्रमुख, पिंपळसोंड. सुरगाणा.

Comments are closed.