NGN News
Latest Marathi News

सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा निर्णय समाजहिताचा; सत्तेकडे जाण्याची हीच वेळ आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लाडक्या नातवाला साथ द्या !!

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती केल्यावर काही दिवस मी पण सम्रभात होतो, कि शिवसेनेशी युती म्हणजे थेट भाजपाला पाठिंबा.. पण काही अवश बारीक विचार केला तर साहेबांनी समाजहितासाठी घेतलेली भूमिका ही योग्यच..!

“ज्यांनी आयुष्यभर आंबेडकरी विचारासाठी संघर्ष केला, त्यांच्यावर विचारश्रेणी मतभेदाच्या नावाखाली शंका घेणं म्हणजे आपल्या समाजाच्या न्यायासाठी उभ्या असलेल्या नेतृत्वावरच अविश्वास दाखवणं होय..!
सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घेतलेली युती ही काही तात्पुरत्या राजकारणाची नाटकी कृती नाही. ही युती आहे – आंबेडकरी जनतेच्या आशा-आकांक्षा अपेक्षा थेट सत्तेच्या दरवाज्यापर्यंत पोहोचवण्याची..!

आजपर्यंत आपण नेहमीच एक गोष्ट ऐकत आलो – “आपल्या समाजाला सत्ता मिळाली पाहिजे.”

मग ती सत्ता मिळवण्यासाठी जेव्हा एखादा नेता युती करून त्या दिशेने वाटचाल करतो, तेव्हा त्या कृतीला टीकेनेच का गाठलं जातं?त्यावर टिकाच का होते दुसऱ्या ही बाजूने विचार करू शकतो ना आपण..!
🔹 राजकारण आणि विचार – दोघं वेगळे असले तरी दिशा समाजहिताचीच आहे यात कुठेही शंका घेण्याचं कारण नाही. हो, मान्य आहे ना एकनाथ शिंदे यांची युती भाजपसोबत आहे.भाजप आणि आंबेडकरी चळवळीचे विचार अनेकदा नव्हेतर परस्परविरोधी ठरले आहेत. विरोधी आहेतच त्यात दुमत असण्याचं कारण काहीच नाही..!
पण ते विचारप्रवाह वेगळे असले तरी, विशिष्ट मुद्द्यांवर कृती करताना एकत्र येणं हाच राजकारणाचा भाग असतो.साहेबांनी केलेली युती हा एक राजकीय भाग आहे.पण त्यात समाजाचं पूर्णतः हित आहे हे कालांतराने समजले..! “आंबेडकरी नेतृत्वाचे उद्दिष्ट हे केवळ भाजपविरोध, काँग्रेसविरोध किंवा कोणत्याही पक्षविरोध नाही – तर बहुजन समाजासाठी शाश्वत विकास, सशक्त सहभाग आणि सत्ता-संस्थांमध्ये हक्काचं स्थान मिळवणं हे आहे.”
🔹 बाबासाहेबांनीही केलं होतं तेच – तात्कालिक युती समाजहितासाठी – आज जे लोक टीका करत आहेत, त्यांनी बाबासाहेबांचा अभ्यास करावा.त्यांनी काँग्रेसला विरोध केला, पण संविधान समितीमध्ये सगळ्यांसोबत काम केलं..!
कारण देश आणि समाजाचं हित त्यांच्या डोळ्यासमोर उभं होत,त्यांनी स्वतःच्या पक्षाला निवडणूक लढवायला उभं केलं, पण काही वेळा काँग्रेसशीच समन्वयही ठेवला..!

त्यांची लढाई होती विचारांसाठी, आणि त्यासाठी कोणती युती उपयुक्त ठरेल हे त्यांनी काळजीपूर्वक ठरवलं.

            

आसेनानी आनंदराज आंबेडकर हेच करत आहेत – त्यांचा विचार आहे आंबेडकरी, पण कृती आहे राजकारणात प्रभावी स्थान मिळवण्यासाठी..!
🔹 विरोधी बाकांवरून घोषणा देणं सोपं, पण सत्ता जवळून बदल घडवणं कठीण आणि गरजेचं आहे..!
आपल्या समाजासाठी आज गरज आहे निर्णय घेणाऱ्यांच्या टेबलावर स्थान मिळवण्याची..! आपल्या मुलांना शिक्षणात स्कॉलरशिप मिळावी,आरक्षण टिकावं, वाढावं,नोकर्‍यांत representation वाढावा दलितांविरोधात अत्याचार होऊ नये. जातीयवादाने कोणी होरपळू नये.हे सगळं फक्त घोषणा देऊन होत नाही. त्यासाठी सरकारमध्ये स्थान हवं – आणि तेच स्थान आज निर्माण करण्याचं काम सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब साध्य करत आहेत..! असं मला वाटतं

🔹 ही युती म्हणजे निष्ठा विकणं नाही – ती दूरदृष्टी आहे.त्यांनी आपला झेंडा बदलला नाही.त्यांनी आपली विचारसरणी फेकून दिलेली नाही.त्यांनी आपले निर्णय घेताना कार्यकर्त्यांचा सल्ला घेतला आहे..! एकट्याने बसून ठरवून निर्णय नाही घेतला,म्हणूनच ही युती म्हणजे निष्ठावान नेतृत्वाची रणनीतीपूर्ण पावले आहेत, नाटकी बदल नव्हे.असे मी ठामपणे सांगतो..!
“राजकारण म्हणजे शक्यतेच्या भूतकाळात अडकणं नव्हे, तर समाजहिताच्या शक्य भविष्यासाठी सखोल निर्णय घेणं.” या युतीमुळे आंबेडकरी समाजाचं स्थान अधिक मजबूत होईल असं मनोमणी वाटतं.आजपर्यंत आपण नुसती मागणी करत आलो आहोत – आता कृती सुरू झाली आहे..!
आजवर आपण टीका करत राहिलो – आता सत्ता-संस्थांमध्ये आपली उपस्थिती दाखवण्याची वेळ आहे. आजवर आपण रस्त्यावर संघर्ष केला – आता निर्णय घेताना टेबलावर बसा, आणि निर्णय घ्या ही वेळ आहे..!

  

“समाजाच्या प्रतिष्ठेसाठी युती केली आहे, विचाराच्या विश्वासासाठी त्याग नाही केला!”

✊ जय भीम | जय संविधान | जय रिपब्लिकन सेना!

       
  • अविनाश शिंदे, नाशिक जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जोपर्यंत सत्तेची किल्ली तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही आणि ती सत्तेची किल्ली जर मिळवायची असेल तर आजच संपर्क करा
8390940000
अभी नही तो कभी नही

Comments are closed.