नाशिक/एनजीएन नेटवर्क
लायन्स क्लब नाशिक पंचवटीचा ३३ व पदग्रहण समारंभ व लिओ क्लब फालकॅंसचा दुसरा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. प्रमुख अतिथी माजी माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव हे होते तर पदग्रहण अधिकारी माजी प्रांतपाल मुंबई ला.संतोष चव्हाण, तर नवीन सदस्य शपथ अधिकारी ला. वैद्य नीलिमा जाधव ह्यांनी कार्य केले.
लायन्स पंचवटी च्या ३३ वे अध्यक्ष ला.सुनील देशपांडे व पद अधिकार्यांना शपथ दिली.लिओ क्लब फान्कॉंसच्या दुसर्या अध्यक्ष लिओ विश्वर्धन सराफ ह्याना पदभार स्वीकारला.लायन्स पंचवटी च्या उत्तम सेवा कार्य सह लायन्स संघटनेला बळ देण्याचे म्हात कार्य लिओ म्हणजेच तरुण लायन्स मध्ये आणून त्यांना संस्कारित करण्याचे मोठे कार्य करीत असून तरुण पिढीवर सेवे चे संस्कार होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन चव्हाण ह्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले .नाशिक मध्ये सेवा करण्याची मोठी शक्ती व व्यक्ती समुदाय असून त्यांना संघटने कडून साथ मिळाल्यास उत्तम कायम स्वरूपी सेवाकार्य नाशिक जिल्ह्य मध्ये होवो शकतात,ह्याच धर्तीवर लिओ च्या माध्यमातून संघटने कडून आर्थिक मदत घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत प्रमुख अतिथी वैद्य विक्रांत जाधव ह्यांनी व्यक्त केले.
नाशिक पंचवटी च सचिव म्हणून ला.अमित कोतकर तर खजिनदार म्हणून ला.राजेंद्र जाधव ह्यांनी तर लिओ क्लब सचिव म्हणून पदभार स्वीकारला.ला.देशपांडे ह्यांनी ह्या वर्षात आता पर्यंत विविध सेवा कार्यान मध्ये नदी स्वच्छ अभियान, औषधी वनस्पती ,गरजू शाळेला सीसी टीव्ही कॅमेरा लाऊन मुलांच्या साव्रक्षनार्थ कार्य केल्याचे नमूद केले. ल मज अध्यक्ष साक्ष पाटील ह्यांनी गरीब रस्त्यावरील मुलांसोबत सोबत आगळे वेगळे रक्षा बंधन केल्याचे सांगताना आपल्या स्व खर्चातून केल्याचे विशेष नमूद केले. महामार्ग वर पंचवटी च्या पानपोईचे पुनर्निर्माण करून आधुनिक केल्याचे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली असून उद्घाटन येत्या दिवसात होणार असल्याचे माजी अध्यक्ष प्रशांत सोनजे ह्यांनी सांगितले.लवकरच महामार्ग येथी लहान देवराई निर्माण करण्याचा मानस वैद्य विक्रांत ह्यांनी व्यक्त केला.सेवा कार्य पाहून माजी प्रांतपाल उद्योगपती .शैलेश संघवी ह्यांनी रस्त्यावरील मुलांच्या सेवा कार्य साठी ५००० देणगी जाहीर केली क्लब च्या परंपरे अनुसार गेली १८ वर्ष स्त्री स्वयं रोजगारासाठी शिलाई मशीन गरजूंना क्लब देत असून आता पर्यंत ५४ स्त्रियांना मदत केली आहे .गरजू दोन मशीन चे वाटप ह्या वेळी करण्यात आले .
नाशिक प्लास्टिक मुक्त ही काळाची गरज असून गोदावरी ला वाचवण्याचा मोठा मार्ग असून ह्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली,हा उक्रम सतत ३ वर्षे करण्याचा मानस ला. अरुण अमृतकर ह्यांनी वक्त केला .क्लब च्या वतीने लहान पिशव्या गेल्या १८ वर्षात ज्यांना शिलाई मशीन दिले त्यांच्या कडून अल्प दारात शिउन घेऊन जमल तसे वाटप करण्यात येणार आहे.रस्त्यावरील मुलांना पोषण आहार देण्याची सुरुवात लिओ क्लब च्या वतीने आपल्या खर्चातून करण्यात आली तर नामपूर येथील विद्यार्थ्यांना गणवेश साठी आर्थिक मदत देण्यात आली.ह्या वेळी माजी अध्यक्ष प्रशांत सोनजे सीमा सोनजे तर साक्षी पाटील ह्यांचा सत्कार करण्यात आला.क्लब च्या सदस्य ला.वृषाली हिरे ह्यांनी भागवत साप्ताह करून प्रभोधन केल्या बद्दल विशेष सत्कार करण्यात आला .आजी आजोबान साठी विशेष कार्य करण्याचा मानस ला.स्मिता यंदे ह्यांनी व्यक्त केला.
सूत्र संचालन ला. रितू चवधरी ,पूजा ताथेड, अंकिता मांडलिक ह्यांनी केले तेजल दिक्षित ह्यांनी आभार प्रदर्शन केले ह्यावेळी ला.अंजली चव्हाण ला.जे.पी.जाधव, मनमाड येथील विवेक बरडिया, जयंत येवला, नाशिक विभागीय अध्यक्ष ला.उषा तिवारी,महेश तिवारी मविपचे संचालक आड ला.लक्ष्मण लांडगे नाशिक जिल्ह्यातील विविध क्लब चे अधिकारी अध्यक्ष मोठ्या संखेने हजार होते