मुंबई/एनजीएन नेटवर्क
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात न्यायालयाकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आले आहे. मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून हे समन्स बजावण्यात आले आहे. दोघांनाही 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सामना या वृत्तपत्रामध्ये आपल्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. याविरोधात त्यांच्याकडून मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. येत्या 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.