NGN News
Latest Marathi News

कष्ट, जिद्द व चिकाटीने प्रत्येकाला आयुष्यात यश मिळते : डॉ. अश्विनी बोरस्ते

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष कामकाज करण्याच्या पद्धती समजून घेताना कष्ट जिद्द व चिकाटीने काम केल्यास सर्वांनाच आयुष्यात यश मिळू शकते, तसेच ध्येय साध्य करणे सुद्धा शक्य होते, असे प्रतिपादन डॉ. अश्विनी बोरस्ते यांनी केले.

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सिडको
येथील वाणिज्य विभागाच्या वाणिज्य मंडळ उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी व यशस्वी महिला उद्योजिका व महिला बचत गट विकास सहकारी संस्थेच्या संस्थापक संचालक यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना डॉ. बोरस्ते बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. कुशारे हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. कुशारे यांनी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय व सर्व प्राध्यापक वर्ग कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा असल्याचे स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. स्मिता पाकधाने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.कल्याणी मोरे यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोनाली भारवे  गायत्री सराफ वृषाली कडाळे या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ एस आर निकम ,वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग डॉ.अमिता गुप्ता, संदीप कसबे, अनुजा बोराडे, अक्षय खताळे, रेविता जाधव, रूपाली जाधव, राखी पाटील, डॉ कल्याणी मोरे, योगिता पवार, दिपाली पवार, श्रद्धा मुरकुटे, प्रकाश जाधव, नितीन शिंगाडे, वैभव खडांगळे, रोहित या सर्वांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.