NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

20 वर्षांच्या संशोधनाचे फलित; कॅन्सरला मुळासकट संपवणारे औषध..

0

लॉस एंजेलिस/एनजीएन नेटवर्क

जगातील सर्वाधिक जीवघेण्या आजारांपैकी एक समजल्या जाणाऱ्या कॅन्सरचे निदान आता शक्य होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.  अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील सिटी ऑफ होप हॉस्पिटलने 20 वर्षांच्या संशोधनानंतर हे औषध विकसित केले आहे. या संशोधनामुळे कॅन्सरला शरीरात वेळेआधी वाढण्याआधीच संपवणे शक्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरवर औषध शोधणाऱ्या वैज्ञानिकांना मोठे यश मिळाले आहे. तब्बल 20 वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर वैज्ञानिकांना कॅन्सरवरील औषध सापडले आहे. AOH1996 असे या औषधाला नाव देण्यात आले असून, त्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. 

हे औषध शरिराला कोणतेही नुकसान न पोहोचवता, कॅन्सर ट्यूमटरला मुळापासून संपवते असे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. कॅन्सरला मुळासकट संपवणाऱ्या या औषधाला एका 9 वर्षाच्या मुलीचे नाव देण्यात आलं आहे. आना ओलिव्हिया हिली नावाच्या या मुलीचा 9 वर्षांची असतानाच मृत्यू झाला होता. पण या औषध निर्मितीत तिचं मोलाचं योगदान आहे. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील सिटी ऑफ होप हॉस्पिटलने 20 वर्षांच्या संशोधनानंतर हे औषध विकसित केलं आहे. हे केंद्र अमेरिकेच्या सर्वात मोठ्या कॅन्सर केंद्रांपैकी एक आहे. दरम्यान वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवू पाहणाऱ्या या औषधाला 1996 मध्ये जन्म झालेल्या आना ओलिव्हिया हिली हिचं नाव देण्यात आलं आहे. 9 वर्षांची असताना तिचं निधन झालं होतं. तिला न्यूरोब्लास्टोमा नावाचा कॅन्सर झाला होता. याच कॅन्सरमुळे 2005 मध्ये तिचं दुर्देवी निधन झालं. न्यूरोब्लास्टोमा हा लहान मुलांना होणारा कॅन्सर आहे. 

70 प्रकारच्या कॅन्सरवर चाचणी

सतत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये या औषधाचे सकारात्मक परिणाम येत असल्याने कॅन्सर रुग्णांसाठी हा मोठा आशेचा किरण ठरत आहे. दाव्यानुसार, या औषधाची 70 प्रकारच्या कॅन्सरवर चाचणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, ब्रेन कॅन्सर, युट्स कॅन्सर, स्किन कॅन्सर, लंग्ज कॅन्सर यांचा सहभाग आहे. या औषधाने चाचणीत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 20 वर्षांच्या संशोधनानंतर हे औषध तयार करण्यात आलं आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.