नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अगस्टीम पिंटो सर व संस्थापिका डॉ. ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी आज शुक्रवार, (दि. ३१ ) रोजी नाशिक येथील प्रसिद्ध यशवंतराव चव्हाण तारांगणाला शैक्षणिक क्षेत्रभेट दिली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी सौरमंडळ, ग्रह-तारे, अवकाशशास्त्र याविषयी सखोल व रोचक माहिती घेतली. वैज्ञानिक माहिती सादरीकरण, दृश्यप्रयोग आणि प्रत्यक्ष अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. विद्यार्थ्यांनी ही क्षेत्रभेट अत्यंत आनंदात व उत्सुकतेने अनुभवली.
या उपक्रमासाठी तारांगणाचे व्यवस्थापक श्री. रणवीर ठाकूर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगरच्या या आगळ्या-वेगळ्या व स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
विशेष म्हणजे, यापूर्वीही शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रभेट कार्यक्रमांतर्गत संगीत स्टुडिओ, हॉटेल, स्पोर्ट्स अकॅडमी, बी.एड. कॉलेज अशा विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील तज्ज्ञ व मान्यवरांचे मार्गदर्शन घेतले आहे. या सर्व क्षेत्रभेटी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व भावी आयुष्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभागप्रमुख भाग्यश्री मराठे व शिक्षिका शीतल चिंचोलीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed.