- वनस्पतीविश्वाची ओळख; रंगीबेरंगी फुलांनी वेधले विद्यार्थ्यांचे लक्ष
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
‘सेंट फ्रान्सिस स्कूल, राणे नगरच्या विद्यार्थ्यांची ‘पपाया नर्सरी’ला शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त विद्यार्थ्यांना वनस्पतीविश्वाची ओळख झाली.
मंगळवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सहलीचे आयोजन करण्यत आले होते. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ‘पपाया नर्सरी’ला शैक्षणिक सहल घेतली. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रकारची फुले, झाडे, वृक्ष तसेच औषधी वनस्पती पाहण्याची व त्यांची माहिती घेण्याची संधी मिळाली. नर्सरीतील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींच्या जाती, त्यांचे उपयोग व पर्यावरणातील महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. औषधी वनस्पती, त्यांचे औषधी उपयोग तसेच औषधनिर्मितीसाठी त्यांची प्रक्रिया कशी केली जाते, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
ऑर्किड, गुलाब, कमळ, लिली यांसारख्या रंगीबेरंगी फुलांनी विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण वेधले. ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांच्या वर्गातील अभ्यासाला पूरक ठरली. प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याची संधी मिळाल्याने ही सहल विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, माहितीपूर्ण आणि संस्मरणीय ठरली.
Comments are closed.