अशोका बिझनेस स्कूलच्या आरोहण-2025 इंडक्शन कार्यक्रमात प्रतिपादन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील अशोका बिझनेस स्कुल कॅम्पसमध्ये 2025-27 च्या नवीन एमबीए बॅचसाठी आरोहण-2025 या इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली नंतर प्रभारी संचालक डॉ.महेश वाघ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून शिस्त, सातत्य, नेटवर्किंग या यशासाठी आवश्यक आधारस्तंभांवर भर दिला.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अशोका बिझनेस स्कूल नेहमीच सक्रिय असते. यावर त्यांनी प्रकाश टाकला.
संस्थेचे सचिव श्री श्रीकांत शुक्ल यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. जिद्द ठेवली तर यशाचा मार्ग सोपा होतो, विद्यार्थ्यांनी स्वतःचा आवाका ओळखून ध्येय निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले. संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.अशोकातील शिस्त, सातत्य, उज्वल यशाची परंपरा या विषयी त्यांनी माहिती दिली.
ए यु स्मॉल फायनान्स बँकेचे वेस्ट झोनल हेड श्री. पंकज शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःचे सामर्थ ओळखून जागतिक घडामोडींशी अद्ययावत कसे रहावे यावर प्रकाश टाकला.सार्वजनिक क्षेत्रातील बँका व खासगीबँक यामधील फरक समजून सांगताना त्यांनी त्यांच्या व्यावसायिक प्रवासातील अनुभवही सांगितले. विद्यार्थ्यांनी समाजात आपली स्वतःची विशिष्ट ओळख निर्माण केली पाहिजे यावर त्यांनी प्रकाश टाकला.नंतरच्या सत्रात व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्सचे एजीएम श्री. अनिल वाघ यांनी उद्योग व चित्रपटातील उदाहरणांद्वारे ,ग्राहक संबंध, ब्रँड मूल्य व व्यवसाय वाढीवर मार्केटिंगचा प्रभाव यावर त्यांनी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना मेहनती शिवाय फळ हाती लागत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी सुरुवाती पासून मेहनत करावी असा महत्वपूर्ण सल्ला दिला.
दुसऱ्या दिवशी टेक महिंद्रा बीपीएस, मुंबईचे एव्हीपी डॉ. अॅलेक्स कौटिन्हो यांनी विद्यार्थ्यांना ब्रँडिंग व जाहिरात क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी प्रभावी संवादकौशल्य व स्वतःचा “MOJO” शोधण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अँटनी वेस्टचे सिनियर अॅडव्हायझर श्री. अनिल गोळे यांनी .सतत नवे कौशल्य आत्मसात करणे ही आजच्या बदलत्या व्यावसायिक वातावरणातील गरज असल्याचे स्पष्ट केले. दुसऱ्या दिवशी अशोका अॅडव्हेंचर क्लब, मोह फार्म येथे अनुभवात्मक क्रियाकल्पाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टीम-बिल्डिंग उपक्रम, मनोवृत्ती पुनर्रचना, SMART गोल्स सेट करणे, आणि नेतृत्व, प्रेरणा व धोरणात्मक विचार यावर आधारित विविध खेळात भाग घेतला.
महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक जमीर मोकाशी व प्रा. मर्विन यांना आमंत्रित केले होते. विविध खेळा द्वारे नेतृत्व गुणाचे महत्व पटवून देत त्यांनी नियोजन व त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली क्षमता, टीममधील प्रत्येक सदस्याच्या मताचा आदर, निरोगी आणि सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण, सदस्यांमध्ये आपसातील मदतीची भावना, आव्हानात्मक परिस्थितीतही उत्पादक काम कसे करावे यासाठी व्यक्तिमत्व वृद्धिंगत करणारे टीम बिल्डिंग गेम्सच्या माध्यमातून घेतले.उद्योग क्षेत्रातील आवश्यक कौशल्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांनी व्यवस्थापनाचे वेगवेगळे धडे दिले. नेतृत्वगुण अंगी असणे आणि त्याचा योग्य करून स्वतः चे करिअर कसे करावे यावर मार्गदर्शन करण्यात आले .
वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवनातील ध्येय परिभाषित करणे, निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम, वचनबद्धता, लोकांचा आदर, तंत्रज्ञान इत्यादी गोष्टींचा त्यात होणारा सहभाग यावर त्यांनी प्रकाश टाकला. यासोबतच वेळेचे व्यवस्थापन, पालक व शिक्षकांप्रती कृतज्ञता, नेतृत्व कौशल्य, मन संतुलित कसे ठेवावे यांचे धडे विदयार्थ्यांना मिळाले. यावेळी विदयार्थ्यांसाठी विविध व्यवस्थापकीय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटी कांही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया यांनी सर्व विद्यार्थ्यांचे एम बी ए साठी प्रवेश घेतल्या बद्दल अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. समारंभ यशस्वी होण्यासाठी संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे व प्रभारी संचालक डॉ. महेश वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयन डॉ.हेमंत वंजारे, डॉ. वैभव उबाळे, श्रुष्टी जैन यांनी केले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Comments are closed.