NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

बोगस बियाणे-खते विक्रीविरोधात कठोर कायदा येणार; समिती गठीत

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून बोगस बियाणे आणि खतांची विक्री राज्यातील अनेक भागांमध्ये झाल्याचे उघड झाल्यानंतर आता सरकारने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुसार, दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. 

ही समिती कायदा तयार करेल आणि दोषीं विरोधात कडक कारवाई करेल, असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं. या समितीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश असेल. जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस खते व बियाणे वाटप केल्याप्रकरणी हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी कॅबिनेटमध्ये मुद्दा उपस्थित केला होता. मुंडे म्हणाले की, जळगावसह इतर जिल्ह्यातील प्रकरणे समोर आली आहेत. जे बियाणे देण्यात आले ते बनावट आहे. खते देखील बनावट देण्यात आली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे मुंडे यांनी मान्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.