मुंबई/एनजीएन नेटवर्क
‘बिग बॉस’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे राहुल महाजन लवकरच त्याची तिसरी पत्नी नताल्या इलिनापासून घटस्फोट घेणार आहे. राहुल आणि नताल्या या दोघांनी वर्षभरापूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप त्यांच्या घटस्फोटाला कायदेशीररित्या मान्यता देण्यात आलेली नाही.
‘ई टाईम्स’ने विश्वासनीय सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि नताल्या या दोघांमध्ये लग्न झाल्यापासून खटके उडत होते. पण ते दोघेही त्यांचे लग्न टिकवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात सतत वाद होत आहेत. त्यामुळेच त्या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.