NGN News
Latest Marathi News

नाशिकचे पुरकर, करमरकर, चोपडा राज्य टेबल टेनिस संघात

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्य टेबल टेनिस संघटनेने राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विविध वयोगटाचे महाराष्ट्राचे टेबल टेनिस संघ जाहीर केले. त्यामध्ये कुशल चोपडा, स्वरा करमरकर व केशिका पुरकर यांची निवड करण्यात आली आहे.

इंदोर येथे होणाऱ्या यूटीटी ८७ व्या आंतर राज्य वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी नाशिकच्या कुशल चोपडा याची पुरुष आणि यूथ १९ वर्षाखालील मुलांच्या संघात निवड झाली. याच बरोबर चोपडा याच्याकडे दोन्ही संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या स्पर्धा १४ ते २१ मार्च २०२६ या दरम्यान होणार आहेत.

स्वरा करमरकर हिची १७ वर्षाखालील ज्युनियर व १९ वर्षाखालील यूथ मुलींच्या संघात निवड झाली. यूटीटी ८७ व्या आंतर राज्य १७ व १९ वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धा २२ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ पर्यंत डेहराडून (उत्तराखंड) येथे होणार आहेत.
यूटीटी ८७ व्या आंतर राज्य कॅडेट व सब जूनियर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सब जूनियर महाराष्ट्र संघात नाशिकच्या केशिका पुरकर हिची निवड झाली. या स्पर्धा २३ मार्च ते ३१ मार्च दरम्यान गांधीधाम (गुजरात) येथे होणार आहे.
नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांची इंदोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या संघ व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

नाशिकच्या टेबलपटूंच्या निवडीबद्दल नासिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष मिलिंद कचोळे, राजेश भरवीरकर, चिटणीस शेखर भंडारी, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, अलका कुलकर्णी, वैभव जोशी, संजय वसंत, सुहास आघारकर. ऋषिकेश पालवे यांनी अभिनंदन केले.

Comments are closed.