मुंबई/एनजीएन नेटवर्क
शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील मुलींना युवती स्वसरंक्षण देणार आहे. ‘युवती स्वसरंक्षण’ राज्यातील प्रत्येक शाळांमधील मुलींना शिकवावे लागणार आहे. याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री यांना लगेच पत्र लिहिणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महिला बालविकास विभागामार्फत राज्यात “युवती स्वप्रशिक्षण” शिबिर सुरू केले जाणार आहे.
युवती आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने सरकार हा निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक दिनानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार युवतींना हिंसाचाराविरुद्ध मनोबल उंचावण्यासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणार येणार आहे. सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्था सहाय्याने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्या येणार आहे. 3 जुलै ते 15 जुलै दरम्यान हे प्रशिक्षण राबवणार आहे. ही संस्था मोफत प्रशिक्षण देणार आहे.