मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणावर आज चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणारा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारने घोषित केलेल्या सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता आज वितरित केला जाणार आहे. सरकारने प्रती क्विंटल साडेतीनशे रुपये शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिमंडळ बैठकीतून आज 3 लाख शेतकऱ्यांना जवळपास 465 कोटींचे सानुग्रह अनुदान वितरित होणार आहे. काही शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज केल्याने त्यांना दुसरा हप्त्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.