मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या भागांमध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानाबद्दल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेमध्ये मदतीची घोषणा केली आहे. सरकार सगळ्यांना मदत करणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी दिले आहे. पुरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत केली जाणार आहे, तसेच दुकानांचे नुकसान झाले असेल तर 50 हजार रुपये आणि टपरीचे नुकसान झालं असेल तर 10 हजार रुपये देणार असल्याचे अजित पवार म्हणाल आहेत.
पुरामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य देण्यात येणार आहे, तसंच दुबार पेरणीकरता बियाणंही उपलब्ध होतील, शेतकरी अडचणीत येणार नाही. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करणार आहोत, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे. तसंच आपण एनडीआरएफ पेक्षा जास्त मदत केली आहे. पुरामुळे गावातले रस्ते खराब झाले असतील तर बांधकाम विभाग रस्ते दुरूस्त करतील, असंही अजित पवार म्हणाले.