NGN News
Latest Marathi News

सेंट फ्रान्सिसच्या विद्यार्थ्यांची नेहरू बॉटनिकल गार्डनला क्षेत्र भेट

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणे नगरचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अगस्टीम पिंटो सर, संस्थापिका डॉक्टर ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या क्षेत्रभेट कार्यक्रमासाठी नुकतीच सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर इयत्ता सातवी विद्यार्थ्यांनी नाशिक मधील प्रसिद्ध पंडित जवाहरलाल नेहरू बोटॅनिकल गार्डनला क्षेत्रभेट दिली. तिथे त्यांनी अनेक औषध उपयोगी झाडांची माहिती घेतली यासाठी त्यांना गार्डनच्या कर्मचारी पूजा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

जांभूळ आवळा वड पिंपळ चिंच या वृक्षांची माहिती विद्यार्थ्यांनी करून घेतली तसेच औषधी वनस्पती निलगिरी अडुळसा अश्वगंधा गुळवेल या वृक्षांची ही उत्सुकतेने माहिती करून घेतली पूजा मॅडम यांनी राणेनगर शाळेच्या या आगळ्या वेगळ्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले . सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगरच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीही या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत संगीत स्टुडिओ,हॉटेल,स्पोर्ट्स अकॅडमी बीएड कॉलेज , तारांगण भेट देऊन तेथील मान्यवरांचे मार्गदर्शन घेतले आहे. या सर्व क्षेत्रभेटीचा उपयोग विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात त्यांना आपला व्यावसायिक प्रवास निवडण्यासाठी ( करियर) व्हावा. यासाठी हा स्तुत्य उपक्रम शाळेचे संस्थापक डॉक्टर अगस्टीन पिंटो सर यांनी सुरू केला आहे.

या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे, शितल चिंचोलीकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed.