- तोफा ,बंदूका, रणगाडी ,तलवारी ,घोडे आदींची घेतली माहिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर येथील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट आर्टिलरी सेंटर देवळाली येथे शनिवारी ( दि. ७ फेब्रुवारी ) रोजी झाली. इयत्ता नववीचे 150 विद्यार्थी व वर्गशिक्षकांनी कुमार मंगलम आर्टिलरी सेंटर संग्रहालयाला भेट दिली. या संग्रहालयात विविध प्रकारच्या शास्त्रास्त्रांची नमुने ठेवण्यात आले आहेत. युद्धात वापरल्या जाणाऱ्या तोफा ,बंदूका, रणगाडी ,तलवारी ,घोडे अशा विविध वस्तूंचे नमुने व माहिती दिलेली आहे.
विद्यार्थ्यांनी या संग्रहालयातील भेटीतून आपल्या इतिहासाची माहिती मिळवली युद्ध विषयक माहितीचे चित्रफीत मुलांना दाखवण्यात आली मुलांनी या भेटीतून माहिती व आनंद मिळवला. क्षेत्रभेटीच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे यांनी मार्गदर्शन केले.
Comments are closed.