NGN News
Latest Marathi News

सेंट फ्रान्सिसच्या विद्यार्थ्यांची इमॅजिका मॅनेजमेंट पार्क सहल उत्साहात

  • 400 विद्यार्थ्यांचा सहभाग; साहसी खेळण्यांचा मनमुराद लुटला आनंद

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणे नगरचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अगस्टीन पिंटो सर, संस्थापिका डॉक्टर ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाद्वारे इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी लोणावळ्या जवळील इमॅजिका मॅनेजमेंट पार्क येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

दोन दिवसांच्या या सहलीमध्ये 400 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. लोणावळा इमॅजिका पार्क मध्ये पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी खूप धमाल केली. खाण्यापिण्याची तेथे चंगळ होती. विन्सी सर यांचे उत्कृष्ट नियोजन आयोजन व उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे सहल आनंदात पार पडली. तेथे विद्यार्थ्यांनी विविध साहसी खेळण्यांचा आनंद मनमुराद लुटला विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनी हा आनंद घेतला. संध्याकाळी फाउंटन शो बघून राणेनगरचे विद्यार्थी परतीच्या प्रवासाला निघाले. विद्यार्थ्यांच्या वतीने व शालेय व्यवस्थापनाच्या वतीने विन्सी सरांचे सगळ्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

या सहलीच्या नियोजनासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे, शितल चिंचोलीकर यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.