पक्षाच्या वतीने नवीन मागण्या; प्रशासनाला निवेदन सादर
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष नुकसान भरपाई आणि घोषित पॅकेजचे अंमलबजावणी करण्याबाबत शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची शेती अतिवृष्टी आणि पुरामुळे वाहून गेली आहे.अनेकांची घरे, जनावरे शेतीची बांधकामे व विहिरी नष्ट झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज फेडण्याची कोणतीही क्षमता शिल्लक राहिलेले नाही.हे फक्त नैसर्गिक आपत्ती नाही तर शेतकऱ्यांच्या जीवावर आलेले एक संकट आहे. लाखोचा पोशिंदाच्या घरी आज उपासमारीची पाळी आली आहे. अशा गंभीर परिस्थितीत आमच्या आंदोलनाची आधीच सत्ताधारी पक्षाने घाईघाईत आणि विरोधी पक्षांच्या दबावाखाली 31.628 कोटी रुपयांचा मोठा आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. ही घोषणा स्वागतार्ह असली तरी, यामध्ये अंमलबजावणीत अडचणी स्पष्ट दिसतात.
हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट मदत द्या
उध्वस्त आणि पूर्ण शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना पंचनामाची आठवण ठेवतात हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट मदत द्यावी. ज्या शेतकऱ्यांची जमीन पूर्ण नष्ट झाली आहे, विहिरी व शेतीचे बांधकाम वाहून गेले आहे, त्यांना विशेष पूर्व पुरनुकसान भरपाई पॅकेज देण्यात यावे. नुकतेच जाहीर झालेल्या 31 हजार 628 कोटीच्या पॅकेज तातडीने प्रत्यक्षात अमलात आणून दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी, कर्जमाफी आणि हमीभाव योजना त्वरित लागू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.पिक विमा कंपन्यावर नियंत्रण ठेवून सर्व का पूरग्रस्तांना विमा रक्कम तातडीने दिली जावी, अशा नवीन मागण्या पक्षाच्या वतीने निवेदनाद्ऱ्यांवारे करण्च्यायात आल्या आहेत. निवेदनावर शिवसेना उपनेते दत्ताजी गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी.सूर्यवंशी, माजी आमदार वसंतराव गीते, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, माजी महापौर यतीन वाघ आदींसह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments are closed.