मंत्री दादाजी भुसे, राम रेपाळे, अजय बोरस्ते यांची प्रमुख उपस्थिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
श्रावण मासाचे औचित्य साधून शिवसेना शिंदे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने आयोजित ‘लाडक्या सुनांसाठी लाडक्या सूनेची मंगळागौर’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिवसेना महिला आघाडीच्या महानगरप्रमुख अस्मिता देशमाने यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले .
गंगापूर रोड येथील बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, शिवसेना सचिव राम रेपाळे, उपनेते अजय बोरस्ते या मान्यवरांची उपस्थिती लाभली. राज्य शासनाचे महिलांप्रती उदारमतवादी धोरण असून त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची प्रतिपादन मंत्री भुसे यांनी यावेळी केले. नियोजनास अल्पकाळ मिळूनही अस्मिता देशमाने यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन करून मोठ्या संख्येने महिलांना एकत्र आणल्याबद्दल त्यांनी गौरोद्गर काढले.
आपल्या मनोगतात, अस्मिता देशमाने यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून महिलांच्या सामाजिक विकासासाठी उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही उपक्रम राबण्यात येतील, अशी माहिती दिली. जिल्हा प्रमुख सुवर्णाताई मटाले यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी शामला दिक्षित, मंगला भास्कर यांसह महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख ज्योती फड, उपमहानगरप्रमुख मोनिका मुथा, करुणा धामणे, रोहिणी देवरे, मंजुषा पवार, आशा पाटील, विधानसभा प्रमुख आरती गायखे, किर्ती ठाकूर, गीता गुप्ता यांनी सहकार्य केले.
विविध स्पर्धांचे आयोजन
या मंगळागौर सोहळ्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ओम साई मंगळागौर मंडळाने प्रथम, सायली बचत गटाने दुसरे, तर समीक्षा गटाने तिसरे पारितोषिक पटकावले. विजेत्यांना अतिथींच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक खेळांचा मनमुराद आनंद लुटत मंगळागौर सणाचा उत्सवमय जल्लोष अनुभवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संपर्कप्रमुख संगीता खोदाना यांनी केले. याप्रसंगी सातशेहून अधिक महिला उपस्थित होत्या.
Comments are closed.