नाशिक/एनजीएन नेटवर्क
समाजातील बौद्धिक आणि अनुभवाचे संचित म्हणून पहिल्या जाणाऱ्या ज्येष्ठांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपल्या आवडत्या कार्यात विरंगुळा शोधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले.
म्हसरूळ येथील एकता ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सातव्या वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. थिगळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव वाढणे हे होते. याप्रसंगी डॉ. थिगळे यांनी कवितांच्या माध्यमातून समाजातील वास्तवाधारित दाखले देवून उर्वरित आयुष्य आनंदात कसे व्यतीत करता येईल, याचा वस्तुपाठ सदर केला. मंडळाने आजवर राबवलेल्या उपक्रमांची त्यांनी मुक्तकंठे प्रशंसा केली. प्रारंभी अतिथींच्या हसरे दीपप्रज्वलन करण्यात आले. मंडळाचे सचिव सुधाकर भोई यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या आजवरच्या उपक्रमांची माहिती देत प्रस्तावित वाटचालीबाबत उपस्थितांना अवगत केले. मंडळाच्या सदस्य प्रा. डॉ. नंदिनी पगार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सन्मानपत्राचे वाचन अंजली वाघमारे यांनी केले. याप्रसंगी वयाचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या सदस्यांचा सन्मानपत्र आणि रोपटे देवून सन्मान करण्यात आला. तसेच ७५ दिवे प्रज्वलित करून, सदस्यांचे औक्षण करून केक कापण्यात आला.
सत्कारार्थींच्या वतीने एड. एकनाथ पगार यांनी मनोगत व्यक्त केले. मंडळाने राबवलेल्या उपक्रमांतून ज्येष्ठांना ऊर्जा मिळत असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात प्रतापराव वाढणे यांनी मंडळाकडून ज्येष्ठांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. मंडळाचे सदस्य सतीश जोशी यांनी कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितांतून कार्यक्रमाची काव्यात्मक गुंफण करून ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन मंडळाचे उपाधाक्ष अनिल विभांडिक यांनी केले. पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री व सौ वाघमारे, विनायक सूर्यवंशी, बबन धाडगे, यशवंत अहिरे, श्री बावरेकर, श्रीमती वैशाली मुठे, श्रीमती उर्मिला ठाकूर, श्रीमती शोभा भुसाळ, सौ, वाढणे, सौ. भोई, सौ. परमार, सौ. खैरनार आणि मंडळाच्या सभासदांचे सहकार्य लाभले.