मुंबई/एनजीएन नेटवर्क
अब्दुल करीम तेलगीने ८४ लाख रुपये एका रात्रीत टोपाझ या प्रसिद्ध बारमधल्या बारबालेवर उधळले आणि अचानक त्याची चर्चा सगळीकडे सुरु झाली आणि त्याच्या स्टँप पेपरचा घोटाळाही बाहेर पडला. हे सगळे कसे घडले, हे ‘स्कॅम २००३’ या पुस्तकाचे लेखक संजय सिंग यांनी सांगितले आहे.
अब्दुल करीम तेलगीच्या आयुष्यावर संजय सिंग यांनी पुस्तक लिहिले. २००१ मध्ये अब्दुल करीम तेलगीचा स्टँप पेपर घोटाळा उघडकीस आला. जी स्कॅम नावाची सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे ती सीरिज संजय सिंग यांच्या पुस्तकावरच आधारलेली आहे. मुंबईतल्या ग्रँट रोड या ठिकाणी टोपाझ नावाचा बार आहे. त्यावेळी तो डान्स बार होता. महाराष्ट्रात तेव्हा डान्सबार सुरु होते. त्या बारमध्ये अब्दुल करीम तेलगीने एका रात्रीत ८४ लाख उडवले होते. डान्सबारमध्ये डुप्लिकेट अभिनेत्री असतात. त्यांच्यावर तो पैसे उडवत होता. एका रात्रीत ८४ लाख रुपये उडवले. इतके पैसे उडवल्यामुळे हा माणूस नेमका कोण, याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळेच अब्दुल करीम तेलगी हे नाव लोकांना कळले. पोलिसांपर्यंत त्याचे नाव गेले. त्यानंतर पुढे त्याचा घोटाळा उघडकीस आला. माझी तेलगीशी दोनदा भेट झाली होती. त्याला मी विचारले होते की डान्सबारमध्ये पैसे उधळले म्हणूनच तुमचा घोटाळा उघडकीस आला का, त्यावर त्याने हो असे उत्तर दिले होते असेही सिंग यांनी सांगितले आहे.