NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

स्पेनचा २० वर्षीय कार्लोस अल्कराझ ‘विम्बल्डन’चा नवा बादशाह !

0

विम्बल्डन/एनजीएन नेटवर्क

 नोव्हाक जोकोव्हिचचे विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील हे वर्चस्व अखेर स्पेनचा २० वर्षीय टेनिसपटू कार्लोस अल्कराझने संपुष्टात आणले. टेनिसचे भविष्य मानले जाणाऱ्या अल्कराझने २०१७ नंतर ऑल इंग्लंड क्लबच्या स्पर्धेत जोकोव्हिचला नमवणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला आणि कारकीर्दीत पहिल्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावले. तसेच सेंटर कोर्टवर जोकोव्हिच ४५ सामन्यांनंतर पराभूत झाला.

रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत अल्कराझने २३ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोव्हिचवर १-६, ७-६ (८-६), ६-१, ३-६, ६-४ असा विजय साकारताना कारकीर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले. गेल्या वर्षी अमेरिकन खुली स्पर्धा जिंकणाऱ्या अल्कराझला विम्बल्डनमध्येही अग्रमानांकन लाभले होते. मात्र, त्यानंतरही त्याने जोकोव्हिचला नमवणे हा धक्कादायक निकाल मानला जात आहे. जोकोव्हिच गेल्या चार विम्बल्डन स्पर्धात विजेता ठरला होता. तसेच त्याने या वर्षी ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्यामुळे अंतिम लढतीत त्याचेच पारडे जड मानले जात होते. त्याला रॉजर फेडररच्या आठ विम्बल्डन जेतेपदांशी बरोबरी साधण्याची संधीही होती. मात्र, अल्कराझच्या उत्कृष्ट खेळामुळे जोकोव्हिचची ही संधी हुकली.

Leave A Reply

Your email address will not be published.