NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

महावितरणकडून १५० उद्योजकांचे प्रश्न मार्गी; सेवा सप्ताहातील तत्परता..

0

सातपूर/एनजीएन नेटवर्क

महावितरणने एकाच दिवशी १५० उद्योजकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावून सुखद धक्का दिला आहे. सेवा सप्ताहाच्या शुभारंभी सातपूर, अंबड, गोंदे तसेच सिन्नर एमआयडीसीतील ग्राहकांना महावितरणतर्फे तातडीच्या सेवांसाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे निमा हाउस येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले.

उद्योजक हे महावितरणला सर्वाधिक महसूल मिळवून देणारे महत्त्वाचे ग्राहक असून त्यांना अखंड आणि नियमित वीज पुरवठा करणे हे महावितरणचे कर्तव्य असल्याचे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले. सेवा सप्ताह फक्त आठ दिवसांपुरताच मर्यादित न ठेवता सातत्याने आपण एकमेकांच्या संपर्कात राहून उद्योजकांच्या वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्याला प्रतिसाद देताना महावितरणची कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी उद्योजकांच्या मागण्यांचा प्राधान्यक्रमाने विचार करण्याचे आश्वासन दिले. निमा हाऊस सातपूर आणि सिन्नर येथे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी आपल्यासह सहकारी अधिकारी उपलब्ध असतील, असे आश्वासन दिले. गेल्या आठवड्यात मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीचे हे फलित असल्याची चर्चा उद्योजकांमध्ये होती. 

याप्रसंगी निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, उर्जा समितीचे अध्यक्ष रवींद्र झोपे, मिलिंद राजपूत, महावितरणचे एच. एच. चौरे, ऋषी जोगळेकर, अजिंक्य जोशी आदी उपस्थित होते. 

Leave A Reply

Your email address will not be published.