नाशिक/एनजीएन नेटवर्क
सौर ऊर्जा क्षेत्राचे भवितव्य उज्वल असून येत्या पन्नास वर्षात या क्षेत्राला सातत्याने मागणी वाढणार आहे.केमिकल,फार्मा, हायड्रोजन या क्षेत्रात भविष्यात भारत जगाचे नेतृत्व करेल.चीनवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे संपूर्ण जग भारताकडे अशाने बघत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अपारंपारिक ऊर्जा आणि रसायने व खत राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी केले.
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या वतीने निमा सभागृहात ना.खुबा यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना खुबा बोलत होते.व्यासपीठावर खा.हेमंत गोडसे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे,चेंबरचे संजय सोनवणे, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष रोहन उपासनी, लघुभारतीचे माजी अध्यक्ष संजय महाजन,निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, रवींद्र झोपे, विरल ठक्कर, विजय जोशी आदी होते.
कोरोनाच्या काळात धास्तावलेल्या उद्योजकांना मोदी सरकारने 22 लाख कोटींची मदत केल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था आज तग धरून आहे. ही मदत केली नसती तर भारतीची अवस्था शेजारी राष्ट्रांसारखी झाली असती असे ना.खुबा यांनी निदर्शनास आणले.आधीचे सरकार केवळ गरिबांच्या नावावर निवडून येत.उद्योगांकडे ते दुर्लक्ष करीत.परंतु मोदी सरकारने औद्योगिक प्रगती बरोबरच देशाच्या विकासासाठी जी पावले उचलली त्याला निश्चितच तोड नाही.प्रत्येक घटकाच्या मागणी आणि समस्या केंद्र सरकार जाणून घेते.त्यानंतर गांभीर्याने विचार करून मदत करण्याचे निर्णय घेते.भारताचा जीडीपीचा दर ईतर देशांच्या तुलनेने चांगला आहे.महागाई चा दरही कमी आहे.भारतात थेट परकीय गुंतवणूक येण्याचा विक्रम झाला आहे.भारताचे अर्थव्यवस्थेचे जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आज गुणगान गात आहेत. आगामी 25 वर्षात भारताची अर्थव्यवस्था अव्वल क्रमांकावर दिसेल असे मी नाही तर जगभरातील अर्थतज्ञ सांगत आहेत याची आठवणही त्यांनी करून दिली. प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले.
अपारंपारिक ऊर्जा, सोलर, तसेच त्या संबंधित विविध मागण्या त्यांनी यावेळी केंद्रीय मंत्र्यांपुढे मांडल्या. सोलर ट्रेड फ्री झोन हवे, सोलर उत्पादकांना कर्जात सवलती मिळाव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन ना.खुबा यांना यावेळी सादर करण्यात आले. याबरोबरच त्यांनी नासिक येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर होत आहेत त्याच धर्तीवर सोलर मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर करता ही केंद्र सरकार मार्फत प्राधान्य द्यावे असे आवाहन केले या सर्व मागण्यांचा मी तसेच माझ्या खात्याचे अधिकारी अभ्यास आणि चर्चा करू,नियमात बसेल त्याप्रमाणे आपण शक्य ते सर्व करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.या संवाद कार्यक्रमास निमा, आयमा,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,लघु उद्योगभारती तसेच महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स प्रोसिएशनचे पदाधिकारी तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्यंत उत्साहात चर्चा सत्र संपन्न झाले पुढील भेटीमध्ये विशेष करून निमास प्राधान्य देईल व वेळ देईल तसेच नाशिकच्या उद्योजकांशी चर्चा करायला मला नक्कीच आवडेल व आपले काही कुठल्याही समस्या प्रश्न असल्यास आपण दिल्ली येथे भेटायला या माझे संपूर्ण सहकार्य राहील असे आश्वासनही यावेळेस त्यांनी दिले
ReplyForward |