नाशिक : येथील कल्याणी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्त्या योगिता बागुल यांना प्राऊड इंडियन पार्लमेंट अवॉर्ड 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आयपीएस अधिकारी आलोक कुमार, ओयासिस ग्रुपच्या सीईओ डॉ.सुषमा, राजेंद्र मुनोत, सुनिता मोडक, अविनाश सकुंडे, भगवंत पाठक, डॉ. संजय धुर्जड आदी उपस्थित होते. या पुरस्कार प्राप्तीबद्दल योगिता बागुल यांचे सर्व थरांतील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.