नाशिक/एनजीएन नेटवर्क
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पश्चिम महाराष्ट्र पुणे आयोजित अभंग काव्य स्पर्धेत नाशिकच्या स्नेहा शिंपी यांची रचना सर्वोत्कृष्ट ठरून त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले. या स्पर्धेत राज्यभरातून ३५१ सदस्यांनी सहभाग नोंदविला.
योग्य परिक्षण आणि निरीक्षणांती हा निकाल जाहीर करण्यात आला. स्नेह शिंपी यांची मुद्देसूद मांडणी परीक्षकांना भावली. एव्हढ्या मोठ्या संख्येने स्पर्धक असताना शिंपी यांनी प्रथम पारितोषिक पक्ताव्ल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.