NGN News
Latest Marathi News

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये १० मार्चपासून ‘कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी’ शिबिर

  • लंडनचे प्रख्यात आंतरराष्ट्रीय हृदयविकार तज्ञ डॉ. सुधीर राठोरे करणार प्रक्रिया मार्गदर्शन

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आणि जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसएमबीटी हॉस्पिटल व एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे विशेष पुढाकार घेत येत्या ९ ते १५ मार्च २०२६ यादरम्यान ‘मोफत हृदयरोग तपासणी व जटिल (कॉम्प्लेक्स) अँजिओप्लास्टी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात लंडन येथे कार्यरत असलेले आंतराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुधीर राठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जटील अँजिओप्लास्टीसाठी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक व वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांनी दिली.

ते म्हणाले की, हे शिबिर १० मार्च ते १५ मार्च पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत शिबिरात रुगंना सुरु राहणार आहे. डॉ. राठोरे हे १३ व १४ मार्च रोजी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून रुग्णांची ‘जटिल अँजिओप्लास्टी’ करण्यासाठी मार्गदर्शन करतील. डॉ. राठोरे हे लंडन येथील एनएचएस हॉस्पिटल येथे ‘कन्सलटंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मिळणार असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

या सात दिवसीय शिबिरामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांवरील अॅडव्हान्स कोरोनरी इंटरव्हेंशन (Advanced Coronary Intervention) उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामध्ये क्रॉनिक टोटल ऑक्लूजन (CTO) अँजिओप्लास्टी, गुंतागुंतीची व जटिल अँजिओप्लास्टी, लेफ्ट मेन व बायफर्केशन अँजिओप्लास्टी, रोटेशनल अॅथरेक्टॉमी (Rotablation), आयव्हस (IVUS) व रोटा OCT यांसारख्या अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार केले जाणार आहेत. तसेच हृदयविकाराचा धक्का बसलेल्या रुग्णांसाठी तातडीची अँजिओप्लास्टी (Primary PCI) करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यासोबतच छातीत दुखणे, जळजळ होणे, चालताना दम लागणे किंवा अचानक दरदरून घाम येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास ती हृदयविकाराची असू शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी या शिबिरात मोफत आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन रुग्णालयाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन बोरसे यांनी केले. विशेष म्हणजे, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या रुग्णांना या शिबिरात मोफत उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा दिली जाणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले. यासोबतच या शिबिराच्या अधिक माहितीसाठी हृदयविकार विभागाच्या 7744913913 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत असलेली साधन सामुग्री आणि सुसज्ज क्रिटीकल केअर विभाग यामुळे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी होत असलेल्या क्लिष्ट शस्रक्रिया, प्रक्रिया एसएमबीटीत करणे शक्य झाले आहे. अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे कौशल्य अवगत असणे गरजेचे असते. हे कौशल्य येथील तज्ञांकडे असल्यामुळे गेल्या काही वर्षांत याठिकाणी फादर ऑफ कार्डीओलॉजीस्ट डॉ सम्युअल मॅथ्युज, दिवंगत सीव्हीटीएस सर्जन डॉ. एस.एस. भट्टाचार्य, बाल हृदयविकार तज्ञ डॉ. गुयेन लॅन ह्यू, प्रसिद्ध तावी (TAVI) कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी तज्ञ डॉ यान कोवाक यांनीही याठिकाणी उपस्थित राहून हृदयविकार प्रक्रिया केल्या आहेत.

नागरिकांनी लाभ घ्यावा
हृदयविकाराच्या उपचारांमध्ये तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. अनेकदा रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम साचलेले असते किंवा त्या पूर्णपणे बंद झालेल्या असतात. अशा जटिल केसेसमध्ये सामान्य अँजिओप्लास्टी यशस्वी होत नाही, तिथे अद्ययावत तंत्रज्ञानाची गरज असते. एसएमबीटीमध्ये आम्ही जागतिक दर्जाची ही सेवा ग्रामीण आणि गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवत आहोत. डॉ. सुधीर राठोरे यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या अनुभवामुळे आणि कौशल्यामुळे आपल्या भागातील रुग्णांना लंडनसारख्या शहरात मिळणारे उपचार मार्गदर्शन एसएमबीटीत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
डॉ. गौरव वर्मा
संचालक व वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट

——–

हे शिबिर कोणासाठी उपयुक्त?

ज्या रुग्णांना हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेजमुळे बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला आहे, परंतु बायपास करणे धोकादायक ठरू शकते किंवा ज्यांना बायपासची भीती वाटते, अशा रुग्णांसाठी हे शिबिर विशेष उपयुक्त आहे. कॅल्शियम साचल्यामुळे कडक झालेल्या रक्तवाहिन्या, रोटा, आयव्हस (IVUS) यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिलेले रुग्ण तसेच ज्या रुग्णांच्या धमनीतील ब्लॉकेज कठीण किंवा गुंतागुंतीच्या ठिकाणी आहे आणि ज्यासाठी तज्ज्ञ हृदयविकार तज्ज्ञांची आवश्यकता असते, अशा रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

Comments are closed.