नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशभरात ५० रेल्वे स्थानकांवर जनऔषधी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये राज्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस, पिंपरी, मालाड, मनमाड, सोलापूर, नागभीड या सहा स्थानकांचा समावेश आहे.
रेल्वेने कोट्यवधी प्रवासी दररोज प्रवास करतात. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देतानाच त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत रेल्वे मंत्रालयाकडून हा पथदर्शी प्रकल्प राबवविला जाणार आहे. या अंतर्गत रेल्वे स्थानकावर प्रवाशांना जाण्यायेण्याच्या मार्गावर ही जनऔषधे केंद्रे सुरू केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात देशभरात ५० स्थानकांवर जनऔषधी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या केंद्रात रेल्वे प्रवाशांना स्वस्त दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून दिली जातील.