** श्रीकांत रौंदळ
सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील नगरपरिषदेचे प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून पी. के. सिद्धार्थ रामकुमार (IAS परिविक्षाधीन अधिकारी) यांची चार आठवड्यांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभाग सहसचिवांच्या आदेशानुसार प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून उपरोक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 26 जानेवारी 2026 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सटाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून ते स्वतंत्र कार्यभार सांभाळणार आहेत. दरम्यान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती ज्योती भगत- पाटील ह्या एक महिना रजेवर गेल्या आहेत.
पी. के. सिद्धार्थ रामकुमार यांनी 2024 मध्ये यूपीएससी परीक्षा चौथा क्रमांकाने उत्तीर्ण केली असून आयएएस अधिकारी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. या अगोदर2022 मध्ये यूपीएससी मार्फत आयपीएस अधिकारी म्हणून देखील त्यांची निवड होऊन प्रशिक्षण देखील त्यांनी पूर्ण केले होते. श्री. पी. के. सिद्धार्थ रामकुमार हे केरळ राज्यातील कोची येथील रहिवासी आहेत.
त्याचप्रमाणे श्री. शिवांश सिंग( IAS परिविक्षाधीन अधिकारी) यांची नंदुरबार नगरपरिषदेचे प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
Comments are closed.