पंचवटी : एनजीएन न्यूज नेटवर्क
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था नाशिक येथे श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती उत्साहात संपन्न झाली. “श्रीमंत बाजीराव पेशवे हे अपराजित योद्धा होते. त्यांनी अटकेपार झेंडे फडकवले. उत्तम प्रशासक, युद्धनीतीचे जाणकार, दूरदृष्टीचे नेतृत्व असलेल्या बाजीराव पेशव्यांना केवळ ‘मस्तानी’ या चौकटीत ठेवू नका, त्यांच्या पराक्रमाचीही प्रेरणा घेतली पाहिजे आणि लोकांसमोर मांडली पाहिजे” असे प्रतिपादन लोकमत चे वृत्तसंपादक श्री संजय पाठक यांनी याप्रसंगी केले.
दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे संजय पाठक, अध्यक्ष सतीश शुक्ल, सौ राजश्री शौचे, प्रमोद मुळे यांचे हस्ते करण्यात आले. स्वागत उपाध्यक्षअनिल देशपांडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय रघुनाथ जोशी केला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष ऍड. भानुदास शौचे यांनी केले. तर आभार सुभाष भणगे यांनी केले. अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी बाजीराव पेशवे अजिंक्य योद्धा होते असे सांगितले.
यावेळी संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल, ऍड भानुदास शौचे, अनिल देशपांडे, धनंजय पुजारी, राजश्री शौचे, ऍड प्रणिता कुलकर्णी, रघुनाथ जोशी, सुभाष भणगे, सौ रत्नप्रभा गर्गे, रामकृष्ण उपासनी, दीपक कुलकर्णी, सागर खाकुर्डीकर, श्री कांचन पंचाक्षरी, अवधूत कुलकर्णी, विश्वास पुराणिक, प्रकाश शुक्ल, प्रमोद मुळे, रोहिणी कुलकर्णी, प्रतीक शुक्ल, हरीश चौबे सौ अनिता कुलकर्णी, शांता जाधव, गजानन जाधव उपस्थित होते.
Comments are closed.