नवीन नाशिक : दिलीप कोठावदे
जिव्हेश्वर सेवा मंडळ व श्री जिव्हेश्वर सेवा महिला मंडळाच्या वतीने श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव निमित्त पावन गणेश मंदिर गणेश चौक नाशिक येथे ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान सायंकाळी ह भ प श्री एकनाथ महाराज सातारकर यांचे प्रवचन संपन्न झाले . लक्ष्मी धवन मंगल कार्यालय येथून शोभायात्रा काढण्यात आली. पोथी वाचन करण्यात आले .भगवान श्री जिव्हेश्वर भक्ती गीत कार्यक्रम ही संपन्न करण्यात आला
भगवान श्री जिव्हेश्वर पालखी सोहळा लक्ष्मी धवन मंगल कार्यालय येथून शोभायात्रा सुरुवात झाली शोभायात्रा दत्त चौक ,मुक्तांगण शाळा ,हनुमान चौक, गणेश चौक, मार्गे काढण्यात आली शोभायात्रेत डॉ हर्षद आढाव, निलेश धारणकर, योगेश साळी, किशोर वाघ, चंद्रकांत फाळके, गणेश मुरलीधर तांबे, दिलीप मारवाडी, राजेंद्र देवळे ,जगन्नाथ एलगट, सचिन मारवाडी ,अनिल कळके, कृष्णा धरम मदन धारणकर राजेंद्र मेंद्रे ,श्रावण बर्वे, नितीन धमके ,कृष्णा सरोदे, गणेश निचळ, हेमंत लहाने, संजय मेंद्रे, विजय धसे . महिला अध्यक्ष स्वाती सरोदे, योगिता मुरलीधर तांबे, जयश्री धारणकर, अश्विनी घोडके, मीनाक्षी जगताप, स्वप्नील घोडके, तारा देवळे, पूनम माटे ,भारती एलगट, अलका डरंगे ,मोहिनी केकाने ,हर्षदा बर्वे ,कावेरी झेंड, योगिता धमके,यमाताई दिवटे, आदींसह समाज बांधवांचा मोठा सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात इयत्ता दहावी बारावी विद्यार्थ्यांचा तसेच विविध गुण संपन्न असलेल्या समाज बांधवांचा गौरव करण्यात आला मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे शेवटी समाज बांधवांकरिता लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते व महाप्रसाद चे आयोजन देखील करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नाच्या घोडके यांनी केले तर आभार राजेंद्र देवडे यांनी मानले. याप्रसंगी प्रसिद्धी प्रमुख हेमंत काळमेख व शैलेंद्र साळी यांनी दिली
—————————–
भगवान श्री जिव्हेश्वर जन्म सोहळ्यानिमित्त महिलांनी विशेष वेशभूषा म्हणजेच चॉकलेटी रंगाची साडी, गळ्यात मोत्याचा सेट हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या वेणीला गजरा, कपाळावर चंद्रकोर टिकली अशा वेशभूषेत महिलांनी मिरवणुकीत लक्षवेधक ठरले.
Comments are closed.