NGN News
Latest Marathi News

समर्थ केंद्रांवर श्री स्वामी समर्थ जयंती उत्साहात साजरी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : श्री स्वामी समर्थ महाराज जयंती निमित्ताने सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रांवर लगबग दिसून आली. हा सोहळा सर्व अबालवृद्ध सेवेकर्‍यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने दिंडोरी,त्र्यंबकेश्वर सह सर्वच श्री स्वामी समर्थ केंद्रांवर सेवेकरी व भाविकांनी विशेषतः आरतीस मोठी गर्दी केलेली होती.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या प्रधान केंद्रात दिंडोरी येथे गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे व आबासाहेब मोरे तर श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर येथे चंद्रकांतदादा मोरे व नितीन भाऊ मोरे यांचे हस्ते सकाळी श्री स्वामी समर्थ महाराज मूर्तीवर अभिषेक करण्यात आला व भूपाळी आरती व तदनंतर साडेदहा वाजता नैवेद्य आरती संपन्न झाली.उपस्थित सेवेकऱ्यांशी या सर्व मान्यवरांनी हितगुज साधले.

दरवर्षीप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज जयंती निमित्त जळगाव ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर गुरुपीठ पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जळगाव येथून त्र्यंबकेश्वरला जाणारी श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी काल नाशिक मध्ये पोहोचली.नाशिक मधील विविध केंद्रांना या पालखीचा लाभ मिळाला. काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी सातपूर कॉलनी येथील केंद्रात पालखीचा मुक्काम होता.शहरातील विविध केंद्रांवर मान्यवरांच्या उपस्थितीत वाद्य वादनासह, भव्य मिरवणूक काढून पालखीचे स्वागत करण्यात आले. ही पालखी आज सकाळी त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाली. दुपारी पालखी त्र्यंबकेश्वर गुरुपीठ येथे पोहोचली.तदनंतर सायंकाळी गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी पालखीतील सहभागी सेवेकर्‍यांना मार्गदर्शन केले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी केलेले महान कार्य व त्यांचा जीवनादर्श तसेच सेवा मार्गाच्या विविध विभागाअंतर्गत सुरू असलेले समाज व राष्ट्रकार्य कसे जोमाने सुरू आहे हे सुद्धा समजावून सांगितले.

या निमित्ताने मखमलाबाद येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात 31 सेवेकरी व भाविकांनी रक्तदान केले.

Comments are closed.