नाशिक/एनजीएन नेटवर्क
मुंबई येथील अलि यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवन दिव्यांगजन संस्थान तसेच नाशिक येथील श्रद्धा फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे दि. २४ ते २५ ऑगस्ट दरम्यान सकाळी ०९ ते ०५ या वेळेत मोफत श्रवण तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती श्रद्धा फाउंडेशनचे संस्थापक सुरेश अण्णाजी पाटील यांनी दिली.
सदर शिबिर कृषीनगर जॉगिंग ट्रॅक समोरील बॅडमिंटन हॉल येथे होणार आहे. अलि यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवन दिव्यांगजन संस्थान ही सशक्तीकारण, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्या अंतर्गत कार्यरत आहे. सदरहू शिबिरात श्रवण तपासणी झाल्या नंतर ज्या नागरिकांनमध्ये श्रवण दोष आढळून आले तर त्यांना केंद्र सरकारच्या के. डी. आय. टी. योजने अंतर्गत अटी शर्ती नुसार मोफत श्रवण यंत्र संस्थेच्या वतीने देण्यात येईल त्या साठी ४० % च्यावर कर्णबधिर दिव्यांग असल्याचे प्रमाणपात्र व किमान २२,००० /- रु. प्रति महिना उत्पन्न असल्याचा दाखला आधार कार्ड व दोन फोटो यांची पूर्तता केल्यास मोफत श्रवण यंत्र दिले जाईल त्यासाठी दुसऱ्याशिबिराचे आयोजन केले जाईल.
सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सुरेश अण्णाजी पाटील व आर्किटेक्ट कृणाल सुरेश पाटील यांनी केले आहे. नाव नोंदणी करण्यासाठी ९५५२५५१०५९ या क्रमांकावर संपर्क साधावा