नाशिक/एनजीएन नेटवर्क
विश्वासार्ह आणि पारदर्शक कारभाराला ग्राहकाभिमुख सेवेची जोड देणाऱ्या शहरातील सुप्रसिद्ध ‘गुरु पब्लिसिटी’ संस्थेचा २३ वा वर्धापनदिन सोमवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी संस्थेच्या गंगापूर रोड वरील कार्यालयास भेट देवून शुभेच्छांचा वर्षाव केला. संस्थेचे संचालक रवी पवार यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
प्रारंभी लहानश्या जागेत वृत्तपत्र क्षेत्राशी निगडीत जाहिरातींचा व्यवसाय सुरु करून रवी पवार यांनी सेवारंभ केला. अस्तित्वाच्या २३ वर्षांत काळानुरूप बदलांचा स्वीकार करत ‘गुरु’ परिवाराने नाशिक शहरातील एक प्रतिथयश जाहिरात संस्था म्हणून लौकीक प्राप्त केला. वृत्तपत्रांतील मुद्रित जाहिरातींच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक आणि रेडीओ माध्यमे, सोशल मिडिया, होर्डींग्स, इव्हेंट व्यवस्थापन आदी अंगांच्या माध्यमातून नाशिक शहर आणि जिल्ह्यात ग्राहकांची मोठी मालिका तयार केली. जाहिरातीतील नाविन्य आणि कल्पकता, शास्रोक्त पद्धतींचा अवलंब ही ‘गुरु पब्लिसिटी’ची बलस्थाने मानण्यात येतात. संस्थेचा आजवरचा प्रवास स्तिमित करणारा आहे.
दरम्यान, वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, माध्यमे आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी संस्थेच्या कार्यालयास भेट देवून शुभेच्छा दिल्या. संचालक रवी पवार आणि ‘गुरु’ परिवाराने शुभेच्छांचा स्वीकार केला. उपस्थित मान्यवरांमध्ये ‘पुढारी’चे संपादक मिलिंद सजगुरे, यूनिट हेड राजेश पाटिल, बाळासाहेब वाजे, महेश अमृतकर, सकाळचे युनिटहेड पिसोळकर, सोमनाथ शिंदे, देशदूतचे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद वैद्य, गंगोत्री इस्टेटचे डायरेक्टर दिपक चव्हाण, लोकनामाचे संपादक जयंत महाजन, KBH ग्रुपचे डायरेक्टर दिपक जाधव, सतिश रकीबे, मयूर रौंदल, रत्नदीप थोरे, महेंद्र पाटील, नावाचे अध्यक्ष प्रवीण चांडक, सचिन गीते, सुभाष गांधी, राजेश शेळके, मोतीराम पिंगळे, प्रताप पवार, शैलेश दगडे, दिनेश गांधी, रोहित पगार, संदीप पाटील, चंद्रशेखर चौधरी, विक्रम सांगळे, योगेश जाधव, विशाल पवार, अभिजीत देवरे, निखिल चव्हाण तसेच गुरु पब्लिसिटी चे हर्षल नेरपगार, योगेश चौधरी, मयूर चौधरी, सुरेश सरोदे, योगेंद्र बोरसे, प्रियंका जाधव, कीर्ती गाडे, आरती शिंदे यांचा समावेश राहिला.