भगूर/दीपक कणसे
पक्ष बळकटीने उभा रहाण्यासाठी एकनिष्ठ कार्यकत्याची गरज असते आणि एकनिष्ठ कार्यकर्ता हा फक्त शिवसेनेकडे असल्यानेच आज उध्दव साहेब कणखरपणे उभे असून शिवसेना कुठेही गेले नसुन फक्त जे शिवसेनेच्या जिवावर मोठे झाले तेच गद्दारी करुन पळाले असुन गद्दारांना त्याची जागा दाखवू असा घणाघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शिवसेना सोशल मिडीयाच्या मेळाव्यात केला.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) सोशल मिडियाचा भगुर मधील तुळजा लाँन्स येथील कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विजय करंजकर पुढे म्हणाले की, शिवसेनेने सर्वाना भरभरून दिल मात्र तरिही उध्दव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून काही पळून गेले मात्र माझा शिवसैनिक जागेवरती आहे, असे अनेक चढ उतार शिवसेनेने पाहिले मात्र पक्ष कधी हल्ला नाही आणि हलणारही नाही.येणाऱ्या निवडणूकां मधे गद्दारांना त्याची जागा दाखवून नेस्तनाबुत करा आणि निवडणूका लढायच्या तर जिंकण्यासाठी आणि जिंकायचचं, मला पक्षप्रमुखांनी आमदारकी दिली पंरतु धोत्र्यांनी ती संधी हिरावली असे सांगत लाथ मारु तेथे पाणी काढणारे कार्यकर्ते आज साहेबा सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रकाश म्हस्के,दिपक खुळे, दिपक गायधनी, राहुल धात्रक,बालम सिरसाठ आदींनी आपले मनोगत व्यक्त करत नाशिक का खासदार कैसा हो.. विजय आप्पा जैसा हो.. च्या घोषणा शिवसैनिकांनी सोसेल मिडिया मेळाव्यात दिल्या. मेळाव्यास युवासेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे, उपजिल्हाप्रमुख दिपक खुळे,नाशिक तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के,विक्रम सोनवणे,साहेबराव चौधरी, माझी शहर प्रमुख अंबादास कस्तुरे उपशहरप्रमुख नितीन करंजकर,संजय पवार, माजी नगरसेवक दीपक बलकवडे,चंद्रकांत कासार,उत्तम आहेर,प्रविण पाळदे,भाऊसाहेब गायकवाड,शंकर करंजकर,संजय शिंदे,शाम ढगे,प्रमोद घुमरे काकासाहेब देशमुख,नितीन करंजकर,वैभव पाळदे, बाळासाहेब गायकवाड,प्रमोद आडके,ज्ञानेश्वर शिंदे,राजाराम शिंदे, भानुदास शिंदे,राहुल धात्रक,प्रकाश सुराणा ,दिपक गायधनी,निवृत्ती मुठाळ,संपत घुगे,नयन रोकडे,प्रमोद मोजाड,मंगेश बुर्के ,प्रभाकर मुसळे, ज्ञानेश्वर उगले, राज घोरपडे,ज्ञानेश्वर थेटे,दिनेश खाडे,निमिष झवर, संदीप गोरे,रोहन थेटे,दिलीप मुसळे, दिपक ताजनपुरे,कल्पेश कदम, संजय गायधनी,तुषार गायधनी,मोहन बरे,योगेश जाधव, दिनेश सिरसागर, पकंज जाधव, पिराजी पवार, शशिकांत घुगे,शरद तिदमे,संदेश बुर्के,गणेश आहेर,अक्षय करंजकर,गजानन कुटे,शेखर जाधव अक्षय डोंगरे,सागर डोंगरे,आदित्य करंजकर,भूषण जाधव,कुणाल मेदगे, अजिंक्य मोजाड,योगेश करंजकर,तुषार राठोड आदीसह त्र्यंबकेश्वर,इगतपुरी, सिन्नर,नाशिक आदींसह ग्रामीण भागातून शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन शिक्षक सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संग्राम करंजकर व देवळाली युवासेना शहरप्रमुख प्रमोद मोजाड यांनी केले.