NGN News
Latest Marathi News

‘शॉप्‍सी’ला ४५० दशलक्षहून अधिक डाऊनलोड्सह ४ वर्षे पूर्ण

  • भारतातील चतुर्थ श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये अधिक विस्‍तार
  • ११.५ दशलक्ष नवीन खरेदीदारांसह उल्‍लेखनीय वाढीची नोंद

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

 फ्लिपकार्टचा शॉप्‍सी हा भारतातील झपाट्याने विकसित होत असलेला हायपरव्‍हॅल्‍यू प्‍लॅटफॉर्म भारतीयांना राजा/राणीप्रमाणे जीवन जगण्‍यास सक्षम करण्‍यासाठी आपल्‍या मिशनला अधिक दृढ करत चौथा वर्धापन दिन साजरा करत आहे, जेथे मूल्‍याप्रती जागरूक खरेदीदारांना अद्वितीय मूल्‍य देत आहे. या प्‍लॅटफॉर्मने ४५० दशलक्ष अॅप डाऊनलोड्सचा टप्‍पा पार केला आहे आणि आता १९,००० हून अधिक पिन कोड्सपर्यंत डिलिव्‍हरी देतो, यासह ते देशातील मेट्रो शहरांपासून चतुर्थ श्रेणीच्‍या शहरांपर्यंत चारही प्रदेशांमध्‍ये पोहोचले आहेत.

यावर्षी शॉप्‍सीने ११.५ दशलक्ष नवीन खरेदीदारांना ऑनबोर्ड केले आहे, ज्‍यापैकी अनेकांनी पहिल्‍यांदाच ई-कॉमर्सचा अनुभव घेतला. प्‍लॅटफॉर्मने आपली उपस्थिती वाढवण्‍यासह भागलपूर, मेदिनीपूर, दुंडा व राजनगर अशी चतुर्थ श्रेणीची शहरे आणि दुर्गम जिल्‍ह्यांमध्‍ये मागणीत मोठी वाढ केली. यामधून शॉप्‍सीच्‍या मूल्‍य-केंद्रित किमती, सुलभ वापर आणि ३०० रूपयांपेक्षा कमी किंमतीमधील क्‍यूरेटेड श्रेणीप्रती वाढता विश्वास दिसून येतो.

फ्लिपकार्टच्‍या शॉप्‍सी व फ्लिपकार्ट मार्केटप्‍लेसचे व्‍यवसाय प्रमुख कपिल थिरानी म्‍हणाले, ”फक्‍त चार वर्षांमध्‍ये शॉप्‍सी भारतभरातील मूल्‍याप्रती जागरूक खरेदीदारांसाठी पसंतीचे गंतव्‍य ठरले आहे. आमची दर्जात्‍मक उत्‍पादनांची व्‍यापक श्रेणी देण्‍यावर, उत्‍पादने शोधण्‍याची प्रक्रिया सोपी करण्‍यावर आणि आपल्‍या देशाचा समावेश असलेल्‍या अनेक ‘मिनी-भारत’मधील ग्राहकांना विनासायास, स्‍थानिकीकृत अनुभव देण्‍यावर लक्ष केंद्रित आहे. शॉप्‍सीच्‍या श्रेणीला या प्रदेशांच्‍या विविध संस्‍कृतींवरून आकार देण्‍यात आला आहे. आम्‍ही प्‍लॅटफॉर्म डिझाइन केला आहे, जो व्‍याप्‍ती वाढवण्‍यासोबत प्रदेशांमधील खरेदीदारांच्‍या दैनंदिन निवडी व अपेक्षांची देखील पूर्तता करतो. आम्‍ही या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍याला साजरे करत असताना भारतातील प्रत्‍येक कुटुंबासाठी हायपरव्‍हॅल्‍यू ई-कॉमर्सला अधिक सर्वसमावेशक, सर्वोत्तम आणि विश्वसनीय करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”    

भारताच्‍या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोच: प्रथम श्रेणीच्‍या शहरांपासून चतुर्थ श्रेणीच्‍या शहरांपर्यंत

लाँच झाल्‍यापासून शॉप्‍सीने आपली उपस्थिती दुप्‍पटीहून अधिकने वाढवली आहे, जेथे ते देशाच्‍या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. सितामढीमधील साडी असो किंवा मोकोकचुंगमधील मिक्‍सर असो प्‍लॅटफॉर्मने भारतातील सर्वात दुर्गम भागांपर्यंत दैनंदिन व्‍यापाराची सुविधा दिली आहे. जम्‍मू व काश्‍मीर, मिझोराम आणि सिक्‍कीम यांसारखी राज्‍ये उत्तर व पूर्वेकडील प्रदेशांमधील विकासामध्‍ये अग्रस्‍थानी आहेत, तर तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्‍ट्र आणि गोवा दक्षिण व पश्चिमेकडील उच्‍च विकासाच्‍या बाजारपेठा ठरल्या.   

सूक्ष्‍म बाजारपेठांसाठी भारत-केंद्रित श्रेणी

शॉप्‍सीची श्रेणी निश्चितच भारत-केंद्रित आहे, जे देशातील सर्वोत्तम शॉपिंग गंतव्‍य ठरले आहे. तसेच वैविध्‍यतेसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, प्रादेशिक संस्‍कृतीमधून आकार मिळाला आहे, तसेच भारताच्‍या ‘हजारो भारत, हजारो ख्‍वाहिशें’ची पूर्तता करत आहे. १,३०० श्रेणींमध्‍ये १६ दशलक्षांहून अधिक उत्‍पादनांसह शॉप्‍सी विचारपूर्वक डिझाइन केलेली प्रादेशिक-केंद्रित श्रेणी देते, ज्‍यामधून स्‍थानिक संस्‍कृती आणि हंगामी गरजा दिसून येतात. ट्रेण्डिंग फॅशनपासून दैनंदिन आवश्‍यक गोष्‍टींपर्यंत प्‍लॅटफॉर्म भारतातील कुटुंबांना किफायतशीर दरांमध्‍ये उच्‍च दर्जाची उत्‍पादने देतो. यंदा, लहान मुलांच्‍या पोशाखांच्‍या ऑर्डरमध्‍ये १५० टक्‍के वाढ झाली आणि मोठ्या अप्‍लायन्‍सेसच्‍या ऑर्डरमध्‍ये २० टक्‍के वाढ झाली.

पहिल्‍यांदाच खरेदी करणाऱ्या डिजिटल शॉपरसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे

शॉप्‍सी वैविध्‍यपूर्ण, भारत-केंद्रित खरेदी अनुभव देते, जो चतुर्थ श्रेणीची शहरे व लहान नगरांमधील पहिल्‍याच मोबाइल वापरकर्त्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. सर्वोत्तम, व्हिज्‍युअल इंटफेस, एआय-समर्थित वैयक्तिकृत फीड्स आणि प्रदेशानुसार उत्‍पादन शोधण्‍याची सुविधा यांसह प्‍लॅटफॉर्म गुंतागूंतीच्‍या नेव्हिगेशनची गरज दूर करतो. शॉप्‍सी विविध श्रेणीनुसार फीड देते, जे अत्‍यंत वैयक्तिकृत व डायनॅमिक आहे. उदाहरणार्थ, तुम्‍ही गया, ग्‍वाल्‍हेर किंवा गुंटुरमधील असाल तर तुम्‍हाला पूर्णत: वेगळे फीड पाहायला मिळेल, जे तुमच्‍या प्रादेशिक पसंती आणि संस्‍कृतीनुसार डिझाइन केलेले आहे. शॉप्‍सी बारकाईने उत्‍पादने डिझाइन करते आणि तुमचे लक्ष वेधून घेईल अशा पद्धतीने सादर करते. अॅप कमी बँडविड्थ असलेल्‍या क्षेत्रांमध्‍ये सुलभपणे कार्यरत राहण्‍याची खात्री देते, तर एआय देखील कॅटलॉग दर्जा व व्हिडिओ कन्‍टेन्‍ट वाढवते. प्रगत लोकेशन इंटेलिजन्‍स पोहोचणे आव्‍हानात्‍मक असलेल्‍या प्रदेशांपर्यंत देखील विनसायासपणे डिलिव्‍हरी करण्‍याची सुविधा देते.

कुटुंबांना एकत्र जोडणारे सेलिब्रेशन्‍स

शॉप्‍सीचे उच्‍च प्रभावी इव्‍हेण्‍ट्स जसे ग्रँड शॉप्‍सी मेळा आणि एण्‍ड ऑफ सीझन सेल डिजिटल-केंद्रित फॅमिली शॉपिंग क्षण बनले आहे, जे वर्षानुवर्षे ऑर्डर आकारमानांमध्‍ये वाढ करण्‍याला गती देत आहेत. ग्रँड शॉप्‍सी मेळा विक्रेत्‍यांनी दिलेल्‍या विविध श्रेणींमध्‍ये १४९ रूपयांपेक्षा कमी किमतीत १ दशलक्षहून अधिक उत्‍पादने देतो. हा सेल भारतच्‍या द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्‍या शहरांमधील ग्राहकांसाठी गेमिफाइड शोध, प्रादेशिक डिल्‍स आणि अद्भुत मूल्‍याच्‍या माध्‍यमातून समकालीन मेळ्यांचा आनंद व उत्‍साह देतो.     

भारतभरातील १.४ दशलक्षहून अधिक विक्रेत्‍यांचे सक्षमीकरण

शॉप्‍सी भारतभरातील १.४ दशलक्ष विक्रेत्‍यांना (फ्लिपकार्टसह) साह्य करते, त्‍यांना विशेषत: मार्की इव्‍हेण्‍ट्सदरम्‍यान नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्‍यास सक्षम करते, जेथे अनेक विक्रेत्‍यांनी आपल्‍या व्‍यवसायामध्‍ये जवळपास दीडपटीने वाढ केली. विक्रेता प्रशिक्षण, व्हिजिबिलिटी टूल्‍स आणि सहज ऑनबोर्डिंगवर सतत लक्ष केंद्रित करत शॉप्‍सी भारतभरात सर्वसमावेशक डिजिटल उद्योजकता निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. शॉप्‍सीने प्‍लॅटफॉर्मवर दर्जात्‍मक तपासणी उपाय देखील सादर केले आहेत. या दृष्टिकोनामध्‍ये अनेक निकृष्ट दर्जाची उत्पादने काढून टाकणे, सूचीची अचूकता सुनिश्चित करणे आणि उच्‍च कामगिरी करणाऱ्या विक्रेत्यांना प्रोत्साहन देणे समाविष्ट होते.

शॉप्सी पाचव्या वर्षात प्रवेश करत असताना प्लॅटफॉर्म प्रत्येक सेवायोग्य पिन कोड, प्रत्येक खरेदीदार आणि प्रत्येक विक्रेत्याला सेवा देण्यासाठी आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे. चार वर्षांच्या यशस्वी कामगिरीनंतर आणि भारत पुढे जात असताना शॉप्सी देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वसमावेशक, सर्वोत्तम, विश्वासार्ह आणि सुलभ मूल्य व्‍यापाराचे भविष्य घडवत आहे.

Comments are closed.