पालघर/एनजीएन नेटवर्क
अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावी इयत्तेतील पस्तीस विद्यार्थ्यांना शिक्षेच्या रॅगिंगच्या नावावाखील जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील एका महाविद्यालयात उघड झाला आहे. यात एका विद्यार्थ्याचा कानाचा पडद्याला इजा झाली आहे. संतापजनक म्हणजे सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबद्दल विद्यालय प्रशासनासाकडून कोणतीही माहिती देण्यात न आल्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, गेल्या 30 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता अकरावीतील सहा ते सात विद्यार्थ्यांनी उदयगिरी हाऊसमध्ये दहावीच्या 35 विद्यार्थ्यांना तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहे सांगत बोलावून घेतले. त्यानुसार विद्यार्थी उदयगिरी हाऊसमध्ये दाखल झाले. पण उशीरा आलेल्या विद्यार्थ्यंना उभे राहाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर उशीरा का आले अशी विचारणा करत विद्यार्थ्यांच्या गालावर सात ते आठ फटके मारण्यात आले. एका विद्यार्थ्याच्या गुप्तागांवर गुडघ्याने मारण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दहावीतली मुले शर्ट इन करत नाही, बूट घालत नाही, तसंच मेसमध्ये मोठमोठ्याने आवाज करतात अशी कारण देत विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. नियम फक्त आम्हीच पाळायचे का, असा सवाल दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारण्यात आला. 30 सप्टेंबरला रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार सुरु होता. रात्री बारानंतर सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेलवर त्यांच्या-त्यांच्या रुममध्ये पाठवण्यात आले. घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला तर वाईट परिणाम होतील अशी धमकीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबद्दल विद्यालय प्रशासनासाकडून कोणतीही माहिती देण्यात न आल्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.