नाशिक/एनजीएन नेटवर्क
बहुचर्चित तलाठी परीक्षेतील मुख्य आरोपी असलेल्या गणेश गुसिंगे याच्या मोबाईलमध्ये चक्क वनविभागाच्या प्रश्नप्रत्रिका आढळून आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी तलाठी भरती परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. यानंतर संशयित आरोपी गणेश गुसिंगे यास ताब्यात घेतल्यानंतर अनेक प्रकार समोर आले. पिंपरी चिंचवड परीक्षेतही हा पाहिजे आरोपी आहे. धक्कादायक बाब म्हणजे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भारती परीक्षेत गुसिंगेला 138 गुण प्राप्त झाल्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर आज नाशिक पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनविभागाच्या प्रश्नपत्रिका गुसिंगेच्या मोबाईलमध्ये आढळून आल्या. नाशकात अटक करण्यात आलेला आरोपी गणेश गुसिंगे म्हाडा आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यात फरार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात म्हाडा परीक्षा भरतीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी खेरवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे.