NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

धक्कादायक ! कुरुलकरची काळी कृत्ये उघड.. दोन महिलांवर अत्याचार

0

पुणे/एनजीएन नेटवर्क

हनीट्रॅपमध्ये अडकून देशाची महत्त्वाची माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप असलेल्या प्रदीप कुरुलकरबाबत आता धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी तरुणी झारादास गुप्ता हिच्या हनीट्रॅपमध्ये डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकर अडकला होता. आता एटीएसने त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले असून त्यात नवी माहिती उघड झालीय. प्रदीप कुरुलकर याने दोन महिलांना डीआरडीओच्या कार्यालयात बोलावून अत्याचार केल्याचा आरोपही एटीएसने केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डीआरडीओच्या कार्यालयात प्रदीप कुरुलकर याने कामाचे टेंडर देतो असं आमिष दोन महिलांना दाखवले. त्यानंतर दोन्ही महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. दोन्ही पीडित महिला या भारतीय असून त्यांना वेगवेगळे टेंडर देतो असे आश्वासन त्याने दिले होते. त्यानंतर डीआरडीओच्या कार्यालयातच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलीय.

कुरुलकर सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी तरुणी झारा दास गुत्ता हिच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. देशभरातील संरक्षण दलाची माहिती पुरवल्या प्रकरणी एटीएसने कुरुलकरला 3 मे ला अटक केली होती. संचालक प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात दहशतवादी विरोधी पथकाने तब्बल 2 हजार पानाचे चार्जशीट न्यायालयात सादर केले आहे. आरोपी प्रदीप कुरुलकर हे मोबाईल, लॅपटॉप आणि सोशल मीडियाच्या इतर माध्यमातून आरोपी झारादास गुप्ता हिच्यासोबत अश्लील चाळे करत संपर्कात आले होते. दरम्यान आरोपी प्रदीप कुरुलकर यांनी आपला मोबाईल फोन बंद केल्यानंतर पाकिस्तानी तरुणी झारा दास गुप्ता हिने लष्करी अधिकारी शेंडेमार्फत कुरुलकर यांच्याशी संपर्क साधला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.