NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

धक्कादायक ! ‘कॉर्डिलिया’वरील अमली पदार्थ एनसीबीकडून जप्त केलेले?

0

 मुंबई/एनजीएन नेटवर्क

समीर वानखेडे यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणांत आपलीही साक्ष नोंदवा अशी मागणी जेष्ठ आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रूझवर एका न्याय दंडाधिकाऱ्यालाही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते, मात्र त्याला गुप्तपणे बाहेर काढण्यात आल्याचा दावा करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. हे दंडाधिकारी महाशय क्रूझवर नशेत इतके चूर होते की त्यांना थेट रूग्णालयात नेण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय. इतकंच नव्हे तर अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी इरफान शेख हे त्यांच्या कोर्टात एनसीबीने जप्त केलाला मुद्देमाल जो पुरावा म्हणून ठेवण्यात येतो त्या अमलीपदार्थांवर थेट डल्ला मारून त्याचे स्वत:ही सेवन करत तसेच ते बॉलिवूडमधील आपल्या काही मित्रांमध्येही वाटत असल्याचा गौप्यस्फोट ही या याचिकेतून करण्यात आला आहे.

गुरूवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठापुढे यावर प्राथमिक सुनावणी झाली. खंडपीठानं याबाबत सीबीआयकडे विचारणा केली असता तपासयंत्रणेच्यावतीनं वकील हितेन वेणेगावर यांनी या याचिकेच्या वैधतेवर सवाल उपस्थित करत याचिकाकर्त्यांकडून एखाद्या प्रतिज्ञापत्राची मागणी केली आहे. कोर्टानंही याची दखल घेत याचिकाकर्ते थेट न्यायव्यवस्थेवर करत असलेल्या या गंभीर आरोपांमागील आधार काय? असा सवाल उपस्थित केला. तूर्तास या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टानं तीन आठवड्यांसाठी तहकूब केलीय. मात्र सीबीआयला या प्रकरणात लक्ष घालण्याचे तोंडी निर्देश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.