NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

धक्कादायक ! ठाण्यातील रुग्णालयात एकाच रात्रीत १८ रुग्णांचा मृत्यू

0

ठाणे/एनजीएन नेटवर्क

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  दोन दिवस आधीच या रुग्णालयातील पाच रुग्ण दगावले होते. त्यानंतर आज आता ही बातमी समोर आली आहे. त्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, एकूण १८ पैकी १३ आयसीयूमध्ये तर इतर ४ हे जनरल वार्ड मधील मृत्यू आहेत. दरम्यान, रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याच्या मुळापर्यंत आम्ही जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. याप्रकरणी चौकशी समिती तयार करण्यात आली असून चौकशी अहवाल मागवला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे दोघे ही लक्ष ठेऊन आहेत, असेही सावंत म्हणाले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसह ठाकरे गट आणि मनसेचे नेते आक्रमक झाले आहेत. 

@ आम्ही ५०० बेडच्या रुग्णालयात जवळजवळ ६०० रुग्ण अॅडमिट केले आहेत. येथील डॉक्टर्स २४-२४ तास काम करत आहेत. आम्ही शक्यतो कोणत्याही रुग्णाला परत पाठवत नाही. इकडे येणारा प्रत्येक माणूस गरीब किंवा आदिवासी असतो. ते अनेकदा अत्यावश्यक स्थितीत येतात. ते कसल्याही स्थितीत आले तरी आम्ही त्यांच्यावर उपचार करतो.

  • राकेश बारोट, रुग्णालय डीन
Leave A Reply

Your email address will not be published.